कर्जमाफीप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार : संजय पाटील घाटणेकर

कर्जमाफीप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार : संजय पाटील घाटणेकर
कर्जमाफीप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार : संजय पाटील घाटणेकर

सोलापूर ः शासनाने कर्जमाफीतून शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी दिली. पण सरकारच्या जाचक अटी आणि निकषांमुळे अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिले. या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, यासाठी शेतकरी सुकाणू समितीचे शिष्टमंडळ मंगळवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी माहिती बळिराजा शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी दिली. सुकाणू समितीने या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला आहे, पण सरकार काही दखल घ्यायला तयार नाही, कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदतीसह गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ५० रुपये दर द्यावा, मका व हरभऱ्यासाठी हमीभाव केंद्रे पुन्हा सुरू करावीत, ऊस उत्पादकांची साखर कारखान्याकडून विविध मार्गांनी होणारी लूट थांबवावी, आदी विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी समितीचे सदस्य भेटून चर्चा करणार आहेत. सुकाणू समितीतील २५ सदस्य या शिष्टमंडळात असणार आहेत. सुकाणू समितीच्या मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला पुण्यात बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही घाटणेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com