संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

आळंदी ः कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने आज, शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी होणार आहे. माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे सव्वादोनला काकडा आरती, पवमान अभिषेक झाल्यानंतर पहाटे चार ते बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल. दरम्यानच्या काळात सकाळी नऊपर्यंत भाविकांच्या महापूजा सुरू राहणार आहेत. नऊ ते अकरा वीणा मंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत माउलींच्या नैवेद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करून महानैवेद्य दाखविला जाईल. यानंतर पुन्हा दुपारी साडेबारा ते दोन माउलींच्या समाधीचे दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे. दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाईल. या वेळी माउलींच्या समाधीवर ब्रम्हवृंदाच्या वतीने पोशाख चढविण्यात येणार आहे. पोशाखानंतर गुरू हैबतबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची आरती, त्यानंतर संस्थानच्या वतीने आरती होईल. त्यानंतर माउलींच्या पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात येतील. त्यानंतर माउलींच्या पालखीचे वीणामंडपातून सायंकाळी सहाच्या दरम्यान देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान होईल. पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर नगरप्रदक्षिणा करून रात्री आजोळघरी विसावेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com