agriculture news in marathi, Sant Gajanan Maharaj Prakatdin, Shegaon, Buldhana | Agrowon

संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याला लाखोंची उपस्थिती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

शेगाव, जि. बुलडाणा : श्री संत गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी (ता. ७) लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वर्षी प्रकट दिन सोहळ्याला गुरुवारी (ता. १) सुरवात झाली होती. दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू होते. बुधवारी झालेल्या सोहळ्याला राज्यभरातील तब्बल एक हजारपर्यंत भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या.

शेगाव, जि. बुलडाणा : श्री संत गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी (ता. ७) लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वर्षी प्रकट दिन सोहळ्याला गुरुवारी (ता. १) सुरवात झाली होती. दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू होते. बुधवारी झालेल्या सोहळ्याला राज्यभरातील तब्बल एक हजारपर्यंत भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या.

बुधवारी माघ वद्य-सप्तमीला सकाळपासून श्रींच्या प्रकट दिनानिमित्ताने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी १२ वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा झाला. या वेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महारुद्र स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती झाली.

संस्थानच्या वतीने दोन लाखांवर भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आला. दुपारी दोन वाजता श्रींच्या १४० व्या प्रकटदिनी पालखीची रथ, मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींची ही पालखी दत्तमंदिर, हरहर शिवमंदिर, श्री शीतलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे प्रकटस्थळ, श्री मारोती मंदिर बाजार विभाग, बस स्थानक व्यापारपेठमार्गे श्रींची पालखी काढण्यात आली. शिवमंदिर, श्री प्रकटस्थळ, श्री मारोती मंदिर येथे विश्‍वतांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या वेळी शहर ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने वारकऱ्यांना चहा, नाश्ता, फराळ व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

संतनगरीत प्रत्येक रस्त्यांवर केवळ भाविकांची गर्दी होती. लाखोंचा समुदाय असूनही सर्वत्र शिस्त पाळली जात होती. अालेल्या भाविकांचे स्वागत करण्यात शेगावकरांनी कुठेही कसर ठेवली नाही. पालखी सोहळा निघाला तेव्हा प्रत्येक घरासमोर रांगोळ्याची अारास सजवण्यात अाली होती. फुलांची उधळण करण्यात अाली.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...