agriculture news in marathi, Sant Tukaram Beej | Agrowon

। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।
मुकुंद परंडवाल
शनिवार, 23 मार्च 2019

देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात शुक्रवारी (ता. २२) अवघी देहूनगरी दुमदुमली. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३७१ बीजसोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार इंद्रायणी नदीच्या तीरावर पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित होते.

देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात शुक्रवारी (ता. २२) अवघी देहूनगरी दुमदुमली. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३७१ बीजसोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार इंद्रायणी नदीच्या तीरावर पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित होते.

सकळिकांचे समाधान। नव्हे देखिल्यावांचून ।।
रूप दाखवी रे आता । सहस्रभुजांच्या मंडिता ।।
शंखचक्रपद्यगदा । गरुडासहित ये गोविंदा ।।
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्यांप्रमाणे भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी हा वैकुंठगमन सोहळा "याचि देही याचि डोळा' अनुभवला. सदेह वैकुंठगमनाची वेळ जशी जवळ येत होती, तशी टाळमृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषात देहूनगरी न्हाऊन निघत होती. लाखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांनी वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी साडेबारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली.

जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीजसोहळ्यासाठी लाखो भाविक गेल्या दोन दिवसांपासून देहूत दाखल झाले होते. बीज सोहळ्याच्या दिवशी पहाटेपासूनच मुख्य देऊळवाड्यात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे इंद्रायणी नदीत स्नान करून भाविक दर्शनासाठी मंदिरात येत होते.

मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्वस्त अशोक मोरे, सुनील दिं. मोरे, अभिजित मोरे, विठ्ठल मोरे, जालिंदर मोरे, सुनील दा. मोरे यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. संस्थानचे विश्वस्त जालिंदर मोरे, सुनील दा. मोरे, विश्‍वजित मोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा झाली. पहाटे साडेपाच वाजता वैकुंठस्थान मंदिरात विश्वस्त सुनील दा.मोरे, अभिजित मोरे, विठ्ठल मोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची महापूजा झाली.

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेल्या पालखीने वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान ठेवले. पालखीच्या पुढे सनई चौघडे, ताशे, नगारे, अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. वैकुंठस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील "घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविण, ब्रह्मभुतकाया होतसे कीर्तनी, भाग्यतरी ऋणी देव ऐसा' या अभंगावर कीर्तन झाले. दुपारी बारा वाजण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तशी तुकाराम तुकाराम.. नामाचा जयघोष सुरू झाला. भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली.

वैकुंठस्थान मंदिरात संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, खासदार श्रीरंग बारणे, सभापती हेमलता काळोखे, पार्थ पवार यांच्या हस्ते आरती झाली. या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते. आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्य देऊळवाड्याकडे आगमन झाले. 

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...