Agriculture news in marathi, Sanvad Yatra, Akola District | Agrowon

सिंदखेडराजा येथून संवाद यात्रेस प्रारंभ
गोपाल हागे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

अकोला ः पुणे येथील आपुलकी सामाजिक संस्था तसेच मुंबईच्या संत गाडगे बाबा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंदखेडराजा ते सेवाग्राम या संवाद यात्रेस शनिवारी (ता. ९) प्रारंभ झाला.

यानंतर ही संवाद यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील गावागावांमध्ये पोचली. तर रविवारी (ता. १०) अकोला जिल्ह्यातील गावांमध्ये संवाद कार्यक्रम झाला.रविवारी (ता. १७) बापू कुटी, सेवाग्राम येथे समारोप होणार आहे. ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी, शेती विरोधी कायद्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तसेच शेतकऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही संवाद यात्रा सुरू झाली.

अकोला ः पुणे येथील आपुलकी सामाजिक संस्था तसेच मुंबईच्या संत गाडगे बाबा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंदखेडराजा ते सेवाग्राम या संवाद यात्रेस शनिवारी (ता. ९) प्रारंभ झाला.

यानंतर ही संवाद यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील गावागावांमध्ये पोचली. तर रविवारी (ता. १०) अकोला जिल्ह्यातील गावांमध्ये संवाद कार्यक्रम झाला.रविवारी (ता. १७) बापू कुटी, सेवाग्राम येथे समारोप होणार आहे. ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी, शेती विरोधी कायद्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तसेच शेतकऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही संवाद यात्रा सुरू झाली.

‘आपुलकी’ व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अभिजित फाळके, संत गाडगे महाराज ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून या यात्रेला सिंदखेडराजा येथून सुरवात झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब, लोकजागर परिवाराचे प्रवीण गिते, ‘मातृतीर्थ’चे प्रवीण बिल्लोरे यांची या वेळी उपस्थिती होती.

 सिंदखेडराजा येथून ही यात्रा आडगाव राजा येथे पोचली. येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना पिण्याचे पाणी, रस्ते, सिंगल फेज विजेची समस्या, मोबाईल टॉवर व ऐतिहासिक किल्ल्याची निगा याबाबत गावकऱ्यांनी मुद्दे मांडले. त्यानंतर यात्रा चिखली तालुक्‍यातील शेलसूर येथे पोचली.

या ठिकाणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, धनंजय ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे उपस्थित होते. या ठिकाणी शेलसुरकरांनी पिण्याचे पाणी, शेतरस्त्यांची समस्या, जलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश, गावतलावाचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली. उंद्री, माटरगाव या ठिकाणच्या संवादात रस्ते, वनजमिनी, शैक्षणिक सुविधांबाबत नागरिकांची मागणी प्रमुख होती.

यावेळी ‘आपुलकी’चे संजय रिंढे, लक्ष्मण रिंढे आदी उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात या यात्रेचे व्यवस्थापन जिल्हा संयोजक प्रा. विजय घ्याळ यांनी केले.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...