मुंबईत २६ जानेवारीला संविधान बचाव आंदोलन

मुंबईत २६ जानेवारीला संविधान बचाव आंदोलन
मुंबईत २६ जानेवारीला संविधान बचाव आंदोलन

मुंबई : सर्वपक्षीय आणि सामाजिक धुरिणांनी संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन पुकारले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लॉँग मार्च निघणार आहे. शरद पवार, राजू शेट्टी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल, खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. २६ जानेवारीला मुंबईत मंत्रालयाजवळच्या आंबेडकर पुतळ्यापासून गेटवेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून हा संविधान बचाव मोर्चा निघणार आहे. खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयुचे माजी नेते शरद यादव, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, माकपचे नेते सीताराम येचुरी, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक  पटेल, काँग्रेसचे गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणारे गणेश देवी यामध्ये सहभागी होणार आहेत.२६ जानेवारीला मंत्रालय ते गेट वे मार्च पूर्ण झाल्यानंतर २ तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com