agriculture news in Marathi, SAO has Seed license right, Maharashtra | Agrowon

बियाणे परवान्याचे अधिकार ‘एसएओ’कडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे परवाने वाटपाचे अधिकार शासनाने अखेर काढले आहेत; मात्र खते विक्री परवान्याचे अधिकार जिल्हा परिषदेकडे कायम ठेवल्यामुळे कृषी विभागातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कृषी खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी आता राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनाच बियाणे परवाना अधिकारी म्हणून घोषित केले आहे. यामुळे बियाणे परवाने वाटप व नूतणीकरणातील राजकीय हस्तक्षेप संपुष्टात येणार आहे. 

पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे परवाने वाटपाचे अधिकार शासनाने अखेर काढले आहेत; मात्र खते विक्री परवान्याचे अधिकार जिल्हा परिषदेकडे कायम ठेवल्यामुळे कृषी विभागातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कृषी खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी आता राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनाच बियाणे परवाना अधिकारी म्हणून घोषित केले आहे. यामुळे बियाणे परवाने वाटप व नूतणीकरणातील राजकीय हस्तक्षेप संपुष्टात येणार आहे. 

विदर्भात कीटकनाशक विषबाधा प्रकरणानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांमधील परवाने वितरणाचा भोंगळ कारभार उघड झाला होता. त्यामुळे कीटकनाशके, खते आणि बियाणे विक्रीचा अधिकार झेडपीकडून काढून घेण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाला दिला होता. या प्रस्तावाची अंमलबजावणी मात्र एकदम करण्यास शासन तयार नाही. कारण, खत परवान्यांचे अधिकार वर्ग करण्याबाबत अजूनही घोळ सुरू आहे. 

शासनाने २४ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कीटकनाशक परवाना वितरणाचे काम काढून घेतले. आता पुन्हा सहा जानेवारीला बियाणे परवाने वितरणाचे अधिकार काढले आहेत. यामुळे झेडपीचा ‘जिल्हा कृषी विकास अधिकारी’ आता फक्त खते विक्रीचा परवाना देऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

खते, बियाणे, कीटकनाशक विक्री परवाने वितरणात झेडपीमधील राजकीय मंडळी सतत हस्तक्षेप करतात. त्यामुळे परवाना वितरणात गोंधळ निर्माण होतो व गुणनियंत्रणदेखील व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. 

‘‘परवान्यांच्या भानगडीतून झेडपीचा कृषी विभाग बाहेर पडला तर कृषी योजना आणि विस्तार कामे करण्यास या विभागाला वेळ देता येईल. त्यामुळे आता खत परवान्याचे अधिकारही झेडपीकडून काढून घेण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...