नेहरूंच्या 'पुनरुत्थान भारत' मंदिराचे मोदींनी केले लोकार्पण

आठवण मोदी म्हणाले, राजस्थानला सरदार सरोवराचे पाणी दिले होते. त्यावेळी वसुधंराराजे शिंदे राजस्थानच्या मुख्यमंत्री, तर भैरोसिंह शेखावत उपराष्ट्रपती होते. शेखावत तेव्हा म्हणाले की, पूर्वी राज्या-राज्यांमध्ये पाण्यासाठी लढाया होत असत. मात्र, आता कोणतेही आडेवेढे न घेता सरदार सरोवराचे हे पाणी आपण राजस्थानला देत आहात. पाक सीमेपर्यंत पाणी पोचवलेत हे खूप मोठे काम आहे असे त्यांनी मला सांगितले.
नेहरूंच्या 'पुनरुत्थान भारत' मंदिराचे मोदींनी केले लोकार्पण
नेहरूंच्या 'पुनरुत्थान भारत' मंदिराचे मोदींनी केले लोकार्पण

अहमदाबाद : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे धरण असलेल्या सरदार सरोवर धरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) लोकार्पण केले. नर्मदा नदीवरील या धरणाच्या कामाचा आरंभ देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 56 वर्षांपूर्वी म्हणजेच 5 एप्रिल 1961 रोजी करण्यात आला होता. त्यावेळी नेहरू यांनी हे भारताच्या पुनरुत्थानाचे नवे मंदीर आहे असे या संकल्पनेचे वर्णन केले होते. 

सरदार सरोवर धरण 2006 मध्ये कार्यान्वित झाले होते. त्याची उंची वाढवून आता 138.68 मीटर एवढी करण्यात आली आहे. देशातील हे सर्वात उंच धरण असून, त्याची क्षमता आता 4.73 दशलक्ष एकर फूट एवढी झाली आहे. या भागातील पकल्पाने प्रभावित लोकांनी वेळोवेळी केलेली निदर्शने आणि वादांमुळे या प्रकल्पाचे काम प्रलंबित राहिले होते. 

ही योजना परिपूर्ण झाली त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. तसेच, या आदिवासी बांधवांना मी नमन करतो, अशा शब्दांत मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली. 

आदिवासींची स्मृती संग्रहालये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदिवासींचे योगदान खूप मोठे आहे. देशासाठी लढाई करण्यात ते कायम अग्रभागी होते. बलिदान देण्यासाठी कधीही मागे हटले नाहीत. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या स्मरणार्थ एक आभासी डिजिटल संग्रहालये बनविण्याचा सरकारचा मानस आहे. त्याची सुरवात गुजरातमधून करण्यात येत आहे. 

नर्मदा म्हणजे परीस नर्मदा नदी म्हणजे परिसरुपी माता आहे. तिचा स्पर्श जिथे होईल तो भाग सुवर्णमय होतो. पश्चिम भारत पाण्यासाठी तडफडतो. पूर्व भारतात विकास हवा आहे. तिथे वीज, गॅस पुरवठा आवश्यक आहे. भारताचे दोन्ही भाग विकसित झाले पाहिजेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com