agriculture news in marathi, sarpanch parishad in alandi from saturday, pune, maharashtra | Agrowon

अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत.  

पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत.  

श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी मंदिराजवळ फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात शनिवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महापरिषदेचे उद्‍घाटन होईल. रविवारी सायंकाळी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. शासनाच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार तसेच सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह इतर तज्ज्ञ ग्रामविकास, कृषी, जलसंधारणासह विविध विषयांवर सरपंचांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामविकासात मोलाची कामगिरी करणाऱ्या निवडक सरपंचांचे अनुभवकथनही होणार आहे.

सरपंच महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स लि., पॉवर्ड बाय जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., प्रायोजक सोनाई पशू आहार, मारुती सुझुकी इंडिया लि., बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., विक्रम टी, डॉलिन - सिडलर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा बायोसिस्टिम्स प्रा. लि., राज्य जलसंधारण विभाग, रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहेत.

सात हजार सरपंचांना प्रशिक्षण
राज्यातील सरपंच मंडळी आपल्या राजकीय करियरमध्ये अॅग्रोवन सरपंच महापरिषदेमधील सहभाग महत्त्वाचा समजतात. सर्व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देणाऱ्या या महापरिषदेसाठी निवडक अनुभवी, सुशिक्षित तसेच युवा सरपंचांची निवड करण्यात आली आहे. ग्रामविकासाचाही गाडा उत्तमपणे सांभाळणाऱ्या महिला सरपंचदेखील महापरिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या महापरिषदेसाठी राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमधून एक हजार सरपंचांची निवड करण्यात आलेली आहे. यापूर्वी राज्याच्या विविध भागांमध्ये सात सरपंच महापरिषदा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यामुळे सात हजार सरपंचांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण देण्यात ‘सकाळ- अॅग्रोवन’ला यश मिळाले आहे.

परिषदेतील चर्चेची शासन घेते नोंद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजातील अडचणींपासून ते पंचायत राज कायद्यातील अधिकारांपर्यंत या महापरिषदांमधून मंथन झाले आहे. या चर्चेत राज्य शासनदेखील सहभागी होते. सरपंचांकडून या महापरिषदेत मांडल्या जाणाऱ्या मागण्या, मतांची नोंद शासन घेते. त्यातून पुढे ग्रामविकासाच्या धोरणांमध्ये बदल घडून येण्यास मदत मिळते, असा सरपंचांचा अनुभव आहे. ग्रामविकासात सरपंचांचा सहभाग अतिशय मोलाचा असला तरी त्यांना अखंड प्रशिक्षण देणारा उपक्रम सध्या नाही. अॅग्रोवनच्या सरपंच महापरिषदेने ही उणीव भरून काढली आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...