दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून : सॅस्कॉफचा अंदाज (सविस्तर)

दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून : सॅस्कॉफचा अंदाज (सविस्तर)
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून : सॅस्कॉफचा अंदाज (सविस्तर)

पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तसेच उर्वरित राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता अधिक आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडूसह भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक तर, पश्चिम किनारपट्टी, उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पूर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची चौदावी दोनदिवसीय बैठक २२ ते २३ एप्रिल या कालावधीत नेपाळच्या काठमांडू येथे झाली. भारतासह सर्व दक्षिण आशियातील भारतासह, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांच्या राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा विचार करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे. प्रशांत महासागरात सध्या सौम्य ‘एल-निनो’ स्थिती आहे. माॅन्सून शेवटच्या टप्प्यात ही स्थिती कमजोर होर्इल, यावर सर्वच सहभागी शास्त्रज्ञांचे एकमत झाले. ऑक्टोबर २०१८ पासून विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राच्या भुपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या सुरवातीच्या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान खूपच वाढले होते. काही जागतिक मॉडेल्सच्या अभ्यासानुसार मॉन्सून हंगामादरम्यान ‘एल निनो’ स्थिती सर्वसामान्य होण्याची शक्यता आहे. मात्र ‘एलनिनो’ स्थिती नेमकी केव्हा सर्वसामान्य होईल, याबाबत अनिश्‍चितता असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. प्रशांत महासागरातील एल-निनोसह इंडियन ओशन डायपोल, युरेशियात उन्हाळा आणि हिवाळ्यातील बर्फाचे आच्छादन, जमिनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा माॅन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम होऊ शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.  बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा फरक म्हणजे इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती सर्वसाधारण स्थितीत आहे, तर मॉन्सूनच्या मध्यावर ही स्थिती सौम्य सकारात्मक होण्याची शक्यता आहे. साधारणत: सकारात्मक आयओडी स्थितीमुळे दक्षिण आशियात सरासरीपेक्षा अधिक, तर नकारात्मक आयओडी स्थितीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो तसेच युरेशियात डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक, जानेवारीत सरासरीइतके तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत सरासरीपेक्षा कमी होते. युरेशियातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व दक्षिण आशियातील मॉन्सून यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो. कोकण, उत्तर महाराष्ट्रात कमी; उर्वरित राज्यात सरासरी इतका पाऊस ‘सॅस्काॅफ’मार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रातील कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ४० टक्के आहे. तर उर्वरित राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता ६० टक्के आहे. कोकण, गोव्यासह कर्नाटक किनारपट्टी, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालच्या काही भाग, ईशान्य भारताचा सीमावर्ती भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ४० ते ६० टक्के आहे. तर ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ५० ते ७० टक्के आहे, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित भारतात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक (५० ते ७० टक्के) असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com