agriculture news in marathi, Saswad, Gazetted Officer's Association condemned the abduction | Agrowon

राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे मारहाणीचा निषेध
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

पुणे ः पाटण (जि. सातारा) तालुक्यात मल्हारपेठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विक्रम पाटणकर यांनी कार्यक्रमात व्यत्यय आणत तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना मारहाण केली. याप्रकरणी महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन या राजपत्रित अधिकारी संघटनेने आक्रमक भूमिका घेत संबधिताना तत्काळ अटक करून नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे ः पाटण (जि. सातारा) तालुक्यात मल्हारपेठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विक्रम पाटणकर यांनी कार्यक्रमात व्यत्यय आणत तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना मारहाण केली. याप्रकरणी महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन या राजपत्रित अधिकारी संघटनेने आक्रमक भूमिका घेत संबधिताना तत्काळ अटक करून नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबधिताना अटक न झाल्यास संघटनेच्याकडून बेमुदत असहकार आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी दिला आहे. महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन या राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग यांना कारवाई करण्याचे निवेदन शनिवारी (ता. १) देण्यात आले. या वेळी कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग यांनी शासन स्तरावरून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन संघटनेला दिले. त्या वेळी संघटनेचे अध्यक्ष संजय गुंजाळ, सरचिटणीस अभिजित जमधडे, कोशाध्यक्ष दीपक गवळी, गणेश तांबे, अभय फलके, राजेंद्र साळुंके, शिवनाथ पवार, एस. पी. जाधव, एस. सी. जाधव, संजय शेवाळे, एस. के. सोनवणे, दत्ता पडवळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन या राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संजय गुंजाळ म्हणाले, की अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांसमक्ष तालुका कृषी अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. हल्लेखारांनी अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये दहशत निर्माण करत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी दबावाखाली व मानसिक तणावाखाली आहेत.

या घटनेपूर्वीही पारोळा (जि. जळगाव) येथे तालुका कृषी अधिकारी श्री. तवर, पूर्णा (जि. परभणी) येथील तालुका कृषी अधिकारी आणि मोताळ (जि. बुलढाणा) येथील कृषी सहायक श्री. दासनोर यांनाही अशाच प्रकारे धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याप्रकरणी ही तत्काळ कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

हल्लेखोर यांच्यावर कारवाई न केल्यास शासनाला कोणत्याही प्रकारचे अहवाल सादर केले जाणार नाहीत. मात्र संघटनेकडून शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक केली जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी असलेले प्रशिक्षण, कार्यशाळा या नियोजितप्रमाणे घेण्यात येतील.
- संजय गुंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी संघटना

इतर बातम्या
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...