agriculture news in marathi, Saswad, The high rate of Gulab, Gerbera in Karnataka, Andhra, Kolhapur | Agrowon

कर्नाटक, आंध्रात कोल्हापूरच्या गुलाब, जरबेराला उच्चांकी दर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : देशात पावसामुळे फूल उत्पादनात व्यत्यय आल्याने फुलांचे दर चांगलेच वाढले आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या बाजारपेठेत जिल्ह्यातील जरबेरा, गुलाब आदी फुलांचे भाव तेजीत आहेत. जरबेरा, गुलाबाची सात ते आठ रुपये इतक्‍या उच्चांकी दराने विक्री होत आहे. गणेशोत्सवापर्यंत हे दर चांगले राहतील, अशी शक्‍यता बाजारपेठेतील सूत्रांची आहे.

कोल्हापूर : देशात पावसामुळे फूल उत्पादनात व्यत्यय आल्याने फुलांचे दर चांगलेच वाढले आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या बाजारपेठेत जिल्ह्यातील जरबेरा, गुलाब आदी फुलांचे भाव तेजीत आहेत. जरबेरा, गुलाबाची सात ते आठ रुपये इतक्‍या उच्चांकी दराने विक्री होत आहे. गणेशोत्सवापर्यंत हे दर चांगले राहतील, अशी शक्‍यता बाजारपेठेतील सूत्रांची आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून बंगळूर, हैदराबाद या मोठ्या बाजारपेठांमध्ये दररोज सुमारे दीड ते दोन लाख जरबेरा व तितक्‍याच प्रमाणात गुलाब फुले पाठविली जातात. या फुलांना या बाजारपेठेत सरासरी २ ते ४ रुपये प्रतिफूल असा दर मिळतो. पण, गेल्या आठ दिवसांपासून या फुलांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

देशात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहेत. स्थानिक बाजारपेठेच्या नजीकच्या गावांमध्ये फूल उत्पादनासाठी प्रतिकूल परिस्थिती बनली आहे. सूर्यप्रकाशाअभावी फुलाचे उत्पादन घटल्याने या भागातून या बाजारपेठांकडे जाणारा फुलांचा ओघ घटला आहे. यामुळे मागणी कायम राहिली आहे. कर्नाटक आंध्रमध्ये उत्सवाचे दिवस सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या लक्ष्मीपूजन व अन्य देवतांच्या पूजेसाठी फुलांची मोठी गरज लागते. यामुळे फुलांना दररोज मागणी असल्याचे फूल उत्पादकांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांपासून सर्वच फुलांचे दर वाढले आहेत. काही कालावधीकरिता तरी हे दर चांगले रहातील अशी शक्‍यता आहे.
- रमेश पाटील,
व्यवस्थापक, श्रीवर्धन बायोटेक, कोंडिग्रे

गणेशोत्सवापर्यंत दर टिकून राहण्याची शक्‍यता
सध्या कर्नाटक  आंध्रात उत्सव सुरू असल्याने या भागात फुलाला मागणी आहे. या उलट मुंबई बाजारपेठेत फारशी मागणी नाही, यामुळे दरही कमी आहेत. गणेशोत्सवापर्यंत बाहेरील राज्यातील मागणी वाढलेली राहील. गणेशोत्सव सुरू झाला, की मुंबईच्या बाजारपेठेत पुन्हा दर वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे सप्टेंबर महिना फूल उत्पादकांच्या दृष्टीने दिलासादायक जाण्याची शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...