agriculture news in marathi, Saswad, Shirur and Baramati are closed for purchase | Agrowon

सासवड, शिरूर, बारामतीत भुसार खरेदी बंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

पुणे ः हमीभावापेक्षा कमी दराने धान्य खरेदी केल्यास शिक्षेच्या तरतुदीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सासवड (नीरा), शिरूर, बारामती बाजार समित्यांमधील भुसार खरेदी बंद केली आहे. गेल्या चार दिवसांपासून भुसार लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे हाल हाेत आहेत.

पुणे ः हमीभावापेक्षा कमी दराने धान्य खरेदी केल्यास शिक्षेच्या तरतुदीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सासवड (नीरा), शिरूर, बारामती बाजार समित्यांमधील भुसार खरेदी बंद केली आहे. गेल्या चार दिवसांपासून भुसार लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे हाल हाेत आहेत.

पुरंदर तालुक्‍याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या सासवड शहरातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात दर बुधवारी विविध धान्य व कडधान्याचे लिलाव होत असतात. बुधवारी (ता. २९) लिलाव नेहमीप्रमाणे असल्याने सकाळपासून शेतकरी स्वतःकडील शेतीमाल लिलावात विकण्यासाठी आणत होते. मात्र, व्यापाऱ्यांनी अचानक सरकारविरोधी भूमिका घेत व्यवहार बंद ठेवल्याने आलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली. आणलेला शेतीमाल शेतकऱ्यांना पुन्हा परतीचा वाहतूक खर्च करीत परत न्यावा लागला. परिणामी बुधवारी व्यापाऱ्यांच्या बंदमुळे सुमारे सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल थांबली.

या वेळी अडत व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अविनाश महाजन, विनीत जाळिंद्रे, रुपचंद कांडगे, कुमार महाजन, जितेंद्र महाजन, संतोष चिंचकर, बिरदीचंद नवलाखा, व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण आदींनी व्यापाऱ्यांची भूमिका मांडली.

दरम्यान, शेतीमाल परत घेऊन जाणारे शेतकरी अधिक संतप्त झाले होते. त्यातील सतीश यादव, शंकर यादव आदींनी सरकारने याबाबत निर्णय करून काही तरी मार्ग काढावा. तसेच, शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी केली.

दरम्यान बारामती आणि शिरूर येथील लिलाव साेमवार (ता. २७) पासून बंदच असल्याने याठिकाणी लिलाव हाेऊ शकले नाहीत. तर फळे, भाजीपाल्याचे व्यवहार या बाजार समित्यांमध्ये सुरळीत सुरू   असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या नुकसानीला सरकारच जबाबदार
विक्रीला जर हमीभावापेक्षा कमी किंमत मिळते, तर हमीभावाने हे धान्य, कडधान्य कसे घ्यायचे? शिवाय हमीभावाचा नियम पाळला नाही, तर तीव्र स्वरूपाचा दंड व शिक्षेची तरतूद असल्याने आम्ही सरकारवर नाराजी व्यक्त करीत लिलाव करण्याबाबत बेमुदत बंद ठेवला आहे.  शेतकऱ्यांच्या नुकसानीला सरकारच जबाबदार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी या वेळी व्यक्त केले.

 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...