agriculture news in marathi, Satana, Nampur Apmc elections in April | Agrowon

सटाणा, नामपूर बाजार समित्यांची एप्रिलमध्ये निवडणूक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नाशिक : सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांची मुदत संपुष्टात आल्याने सहकार विभागाने तयार केलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी (ता. ५) जाहीर करण्यात आली. या यादीवर हरकती व सूचना घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला. त्यानंतर साधारणत: ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत असल्याने या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

नाशिक : सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांची मुदत संपुष्टात आल्याने सहकार विभागाने तयार केलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी (ता. ५) जाहीर करण्यात आली. या यादीवर हरकती व सूचना घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला. त्यानंतर साधारणत: ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत असल्याने या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

सहकार क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच सटाणा व नामपूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सोसायटी, शेतकरी प्रतिनिधी असे गट कमी करून दहा गुंठे जमीन ताब्यात असलेल्या सर्वांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मतदारांची संख्याही कमालीची वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी या दोन्ही बाजार समित्यांसाठी गणांची व आरक्षणाची निश्चिती करण्यात आली आहे. राखीव पाच जागांसाठी चिठ्ट्या काढण्यात आल्या आहेत.

सहकार कायद्यान्वये जाहीर करण्यात आलेल्या मतदारांच्या प्रारूप मतदार यादीनुसार एक महिना या यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार असून, त्याची सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. सोमवारी जिल्हा निवडणूक शाखेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर साधारणत: ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...