agriculture news in marathi, In Satara, the area under saddle cultivation decreases by 2.5 thousand hectare | Agrowon

साताऱ्यात आडसाली उसाच्या क्षेत्रात घट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सातारा : जिल्ह्यात आडसाली उसाची २३ हजार ३६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार ७८८ हेक्‍टर उसाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. तर माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यात आडसाली ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

सातारा : जिल्ह्यात आडसाली उसाची २३ हजार ३६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार ७८८ हेक्‍टर उसाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. तर माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यात आडसाली ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍याचा अपवाद वगळता कऱ्हाड, फलटण, सातारा, वाई, कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण, पाटण, जावली या सर्व तालुक्‍यांत कमी अधिक प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. जास्त उत्पादन, लवकर ऊस तुटेल, तसेच रब्बी हंगामात आंतरपिके घेता येत असल्याने आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला होता. मात्र, या हंगामात शेतकऱ्यांकडून आडसाली ऊस करण्याचा कल कमी झाल्याचा दिसून येत आहे.

आडसाली लागवडीच्या काळात झालेला दमदार पाऊस, काही कारखान्यांकडून बियाण्यांसंदर्भात बदलेली धोरणे, तसेच या हंगामात होत असलेली मजूरटंचाई यामुळे आडसाली ऊस लागवडीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गत हंगामात २५ हजार ८२४ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. तर या हंगामात २३ हजार ३६ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

या तुलनेत दोन हजार ७८८ हेक्‍टर उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. सर्वाधिक सात हजार ७३८ हेक्‍टर ऊस लागवड कऱ्हाड तालुक्‍यात झाली आहे. पूर्व हंगामी, सुरू हंगामात ऊस लागवड किती क्षेत्रावर होईल तसेच खोडवा ऊस किती क्षेत्रावर ठेवला जाईल, यावर पुढील गळीत हंगामाचे भवितव्य ठरणार आहे.

फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागात बागायत असल्याने या तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. मात्र माण, खटाव या दोन प्रमुख दुष्काळी तालुक्यात पाण्याची उपलब्धता झाल्याने उसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या दोन तालुक्‍यात ७८१ हेक्‍टर क्षेत्रावर निव्वळ आडसाली उसाची लागवड आहे. पूर्वहंगामी व सुरू हंगामात उसाची लागवड होणार असल्याने या तालुक्‍यात उसाचे क्षेत्र वाढणार आहे.

तालुकानिहाय आडसाली ऊस लागवड (हेक्‍टरमध्ये)

सातारा ः ७,७३८, कोरेगाव ः १५७६, खटाव ः ६४४, कऱ्हाड ः ६५४६, पाटण ः ७५६, वाई ः ९०१, जावली ः १२३, खंडाळा ः ८१०, फलटण ः ३८०५, माण ः १३७.

इतर बातम्या
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
बियाणे, विमा कंपनीविरुद्ध शेवगावला...नगर ः ‘बीटी कापूस वाणाची लागवड केल्यास हे...
...जीव लावलाय मालकावरीकोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस...
शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा...अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत २०१६-...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...मुंबई  ः कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
‘महाबीज’च्या ‘बीटी’ला बोंड अळीने पोखरलेनागपूर  ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे...
बिगर नोंदणीकृत निविष्ठांची राज्यव्यापी...पुणे : बिगर नोंदणीकृत निविष्ठांची तपासणी...
तापमानातील फरकाचा भाज्या, फळबागांना फटकापुणे : राज्याच्या विविध भागांत दिवसा आणि...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान...अकोला ः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लाॅंग...
तापमानातील तफावत कायमपुणे : राज्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात चढ-...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...