सातारा जिल्ह्यात ११६३ शेततळी पूर्ण

सातारा जिल्ह्यात ११६३ शेततळी पूर्ण
सातारा जिल्ह्यात ११६३ शेततळी पूर्ण

सातारा ः मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात ११६३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ६० शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस शेततळी भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. दोन हजार शेततळ्यांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ४५३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३२६५ अर्ज पात्र; तर ११८९ अर्ज अपात्र ठरले असून, ८१ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २७४६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. २४४२ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे.

सध्या ६० शेततळ्यांचे काम सुरू असून, ११६३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेत लाभ घेता येत आहे. शाश्वत पाणीसाठ्यासाठी ही फायदेशीर असल्याने जास्ती जास्त शेतकरी कसे सहभागी होतील यासाठी कृषी विभागाकडून पसार आणि प्रचार करणे आवश्यक आहे. पाऊस सुरू असल्याने शेततळ्यात पाण्याची साठवणूक सुरू झाली आहे. मात्र जास्त पावसामुळे शेततळ्याची कामेही संथ गतीने सुरू आहेत.  

१०२८ शेततळ्याचे अनुदान वितरित जिल्ह्यात २०१६ पासून ११६३ शेततळी पुर्ण झाली आहे. यामधील १०२८ शेततळ्याचे चार कोटी ७० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. उर्वरित शेततळ्याचे अनुदान निधी उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे सातारा- ७०, कोरेगाव १६९, खटाव १५७, माण ३००, फलटण २५२, वाई ६३, खंडाळा ७३, महाबळेश्वर ३, जावली १२, पाटण ८, कऱ्हाड ५६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com