agriculture news in marathi, in Satara district Rabbi sowing at 89% | Agrowon

सातारा जिल्ह्यात रब्बी पेरणी ८९ टक्‍क्‍यांवर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सातारा : परतीचा दमदार पावसाने रब्बी हंगामास पोषक वातावरण झाल्यामुळे जिल्ह्यात ८९ टक्के पेरणीची कामे उरकली आहेत. पिकांची वाढ चांगली झाल्याने हा हंगाम समाधानकारक ठरण्याची चिन्हे दिसत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍याचा रब्बी हंगाम हा प्रमुख असतो. यामुळे या पाच तालुक्‍यात जास्त पेरणी होते. या हंगामाच्या सुरूवातीस परतीचा दमदार पाऊस या दुष्काळी तालुक्‍यात झाला होता. या पावसाने रब्बी हंगामास पोषक वातावरण झाल्याने पेरणीस वेळेत प्रारंभ झाला होता. यामध्ये  रब्बी ज्वारी पिकांची पेरणी अधिक झाली आहे.

सातारा : परतीचा दमदार पावसाने रब्बी हंगामास पोषक वातावरण झाल्यामुळे जिल्ह्यात ८९ टक्के पेरणीची कामे उरकली आहेत. पिकांची वाढ चांगली झाल्याने हा हंगाम समाधानकारक ठरण्याची चिन्हे दिसत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍याचा रब्बी हंगाम हा प्रमुख असतो. यामुळे या पाच तालुक्‍यात जास्त पेरणी होते. या हंगामाच्या सुरूवातीस परतीचा दमदार पाऊस या दुष्काळी तालुक्‍यात झाला होता. या पावसाने रब्बी हंगामास पोषक वातावरण झाल्याने पेरणीस वेळेत प्रारंभ झाला होता. यामध्ये  रब्बी ज्वारी पिकांची पेरणी अधिक झाली आहे.

जिल्ह्यात एक लाख १९ हजारावर ज्वारीचे पेरणी झाली आहे. सुरवातीचा दमदार पाऊस सध्या असलेली थंडी यामुळे ज्वारीची वाढ चांगली होत आहे. पहिल्या टप्प्यात ज्वारीची कणसे निसावू लागली आहे. पाण्याची उपलब्धतता असलेल्या शेतकऱ्यांचे ज्वारीला पाणी देण्याचे काम सुरू आहे. ज्वारीचे क्षेत्र वाढल्याने व समाधानकारक झाल्याने ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळणार असा अंदाज आहे. त्याचबरोबर जनावरांना चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने चारा टंचाई दूर होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून रब्बी ज्वारीचे मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याने वैरण विकास कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. चाऱ्याच्या  दुष्टीने मक्‍याची लागवड सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त झाली आहे. तसेच दरातील स्थिरतेमुळे हरभरा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात २७ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली असून सध्या हरभरा फुलोऱ्यात आला आहे. गहू पिकांची ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

थंडीमुळे गव्हाची वाढ चांगली होत आहे. मात्र, काही भागात गहू पिकांची अपेक्षित वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. रब्बीतील पिकांची झालेली लागवड व समाधानकारक होत असलेली वाढ यामुळे हा हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

इतर बातम्या
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या...धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी...
‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत...पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या...नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या...
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२)...