agriculture news in marathi, Satara District on top in Agri Tourism | Agrowon

कृषी पर्यटनात सातारा जिल्हा आघाडीवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

सातारा : कृषीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र उभारणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात सध्या ५० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे सुरू असून, त्यातून रोजगाराच्या निर्मितीसह थेट भाजीपाला विक्रीस बळ मिळत आहे. राज्यात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

सातारा : कृषीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र उभारणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात सध्या ५० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे सुरू असून, त्यातून रोजगाराच्या निर्मितीसह थेट भाजीपाला विक्रीस बळ मिळत आहे. राज्यात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे आणि सतत कामाचा ताण असल्याने जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून अनेकजण सध्या पर्यटनासाठी जाऊ लागले आहेत. जास्त प्रवासापेक्षा थोड्या अंतरावरच असलेल्या कृषी पर्यटनाकडेही लोकांचा ओढा वाढू लागला आहे. याकडे जिल्ह्यातील शेतकरी संधी म्हणून बघत जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करत पर्यटन केंद्राची उभारणी केली जात आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी या पर्यटनाकडे येणारे पर्यटक कृषी पर्यटनाकडेही वळू लागली आहे. 

जिल्ह्यात सध्या सुमारे ५० ते ५५ कृषी पर्यटन केंद्रे असल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे. पूर्वी केवळ एक ते दोन असणारी संख्या गेल्या चार ते पाच वर्षांत ५५ पर्यंत जाऊन पोचली आहे. त्या माध्यमातून अनेकांच्या हाताला कामही मिळाले आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील केंद्राची संख्या जास्त आहे. या केंद्राच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. दिवसेंदिवस पर्यटन केंद्राच्या संख्येत वाढ होत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणूनही आता नावारूपास येऊ लागला आहे.

या पर्यटन केंद्रावर तयार केला जाणारा भाजीपाला ग्राहकांकडून थेट विक्री होत असल्याने चांगला दरही मिळण्याबरोबरच ताजा भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध होत आहे. कृषी पर्यटनासाठी शासनाची कोणतीही योजना नसतानाही सातार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. केंद्राच्या उभारणीच्या भांडवलासाठी कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात आहे. यामुळे भांडवलाचा प्रश्‍न कमी होऊ लागला आहे.

जिल्हा परिषदेमार्फत प्रशिक्षण
जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढावी, यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी बारामती विज्ञान केंद्रात निवासी प्रशिक्षणाचे अायोजन केले जाते. या प्रशिक्षणात कृषी पर्यटन केंद्र निर्मिती, ते कसे चालवावे यासाठीही प्रशिक्षण देण्यात येते. त्या माध्यमातून संबंधितांना त्याची व्याप्ती, भविष्यातील संधी आणि निश्‍चित दिशा मिळत असल्यानेही केंद्रांच्या संख्येत भर पडत आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...