agriculture news in marathi, satara farmers waiting for procurement centers | Agrowon

सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

सातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असताना नाफेडकडून प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनसाठी जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ही कागदावरच असून सध्या सोयाबीनची २८०० ते ३ हजार रुपये दराने खरेदी होत आहे. खरेदी केंद्रे सुरू होत नसल्याने प्रशासन व्यापाऱ्यांना पूरक भूमिका घेत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलेले जात आहे. 

सातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असताना नाफेडकडून प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनसाठी जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ही कागदावरच असून सध्या सोयाबीनची २८०० ते ३ हजार रुपये दराने खरेदी होत आहे. खरेदी केंद्रे सुरू होत नसल्याने प्रशासन व्यापाऱ्यांना पूरक भूमिका घेत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलेले जात आहे. 

खरीप हंगामात पावसावर कमी कालावधीत सहज येणारे आणि दसरा, दिवाळी व रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करून देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना अजून केवळ सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होणार, याबाबत अजूनही काहीच स्पष्ट होत नाही. 

मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला अपेक्षित दर न मिळाल्याने क्षेत्रात घट होत आहे. या खरिपात जवळपास १२ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. सध्या सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांना पीकउत्पादनासाठी केलेला खर्च तरी मिळावा, या हेतूने केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याचे धोरण घेतले आहे. यंदा सोयाबीनचा हमीभाव ३३९९ रुपये जाहीर केला आहे. त्यानुसार हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करू नये, असा कायदा सरकारने केला आहे. मात्र, हमीभाव हा खरेदी केंद्रापुरता मर्यादीत असून प्रत्यक्ष खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. शेतकऱ्यांकडे काढलेले सोयाबीन ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे सोयाबीन लगेच विक्रीसाठी बाजारपेठेत आणले जात आहे. याचा व्यापारी फायदा उठवत असून सोयाबीनची २८०० ते ३००० रुपये क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. पणन विभागाकडून जिल्ह्यात सातारा, कोरेगाव व वाई येथे ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. मात्र, यापैकी एकाही केंद्रांवर अजूनही खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडेच सोयाबीन विक्री करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 

`व्यापारी सहायक भूमिका` 
जिल्ह्यात सध्या ८० टक्के क्षेत्रातील सोयाबीनची काढणी व मळणीची कामे झाली आहेत. शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे सोयाबीनची मिळेल त्या दरात केवळ नाईलाजास्तव विक्री करीत आहे. तरीही शासनाने खरेदी केंद्रे सुरू करण्याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे एकिकडे व्यापारी क्विंटलमागे ६०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत, तर दुसरीकडे पणन विभाग मूग गिळून गप्प आहे. परिणामी ही स्थिती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी सहायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...