agriculture news in Marathi, In Satara green chilli 400 to 500 rupees per kg | Agrowon

साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) हिरवी मिरची, टोमॅटो, वाटाणा, दुधी काकडी तेजीत तर कारली, वाॅल घेवडा, मेथी, कोथिंबीर आवकेत वाढ झाली आहे. हिरव्या मिरचीची १४ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला होता. मिरचीस दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) हिरवी मिरची, टोमॅटो, वाटाणा, दुधी काकडी तेजीत तर कारली, वाॅल घेवडा, मेथी, कोथिंबीर आवकेत वाढ झाली आहे. हिरव्या मिरचीची १४ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला होता. मिरचीस दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.

टोमॅटोची ३५ क्विंटल आवक झाली असून टोमॅटोस दहा किलोला १५० ते २०० असा दर मिळाला. वाटाण्याची ३८ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ४५० असा दर मिळाला आहे. दुधीची चार क्विंटल आवक होऊन दहा किलोस दुधीस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. काकडीची २२ क्विंटल आवक होऊन दहा किलो काकडीस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. 

टोमॅटो, वाटाणा, दुधी, काकडीस दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. गवारीची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलो गवारीस ५०० ते ६०० असा दर मिळाला आहे. ढोबळी मिरचीची पाच क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे. पावट्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे. 

वांग्याची १५ क्विंटल आवक होऊन दहा किलो वांग्यास २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरची २९ क्विंटल आवक होऊन दहा किलो फ्लॅावरला १५० ते २०० असा दर मिळाला आहे. कारली, वॅाल घेवडा, मेथी, कोथिंबीर आवकेत वाढ झाली आहे. 

कारल्याची तीन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. वॅाल घेवड्याची पाच क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. मेथीची २५०० जुड्याची आवक होऊन मेथीस शेकड्यास ८०० ते १००० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची ३००० जुड्याची आवक होऊन कोथिंबिरीस शेकड्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...