साताऱ्यात वाटाणा प्रतिदहा किलो ३०० ते ५०० रुपये

साताऱ्यात वाटाणा प्रतिदहा किलो ३०० ते ५०० रुपये
साताऱ्यात वाटाणा प्रतिदहा किलो ३०० ते ५०० रुपये

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) वाटाणा, गवारी, कोथिंबीर तेजीत असून हिरवी मिरची व ढोबळी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. वाटाण्याची ५५ क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास ३०० ते ५०० असा दर मिळाला आहे. वाटाण्यास रविवारच्या (ता. २६) तुलनेत दहा किलोमागे १०० रुपये दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गवारीची २५ क्विंटल आवक झाली असून दहा किलो गवारीस २५० ते ३५० असा दर मिळाला आहे. गवारीस दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. शेवग्याची १३ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास २०० ते ३०० असा दर मिळाला आहे.

पावट्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो पावट्यास २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. भेंडीची पाच क्विंटल आवक झाली असून दहा किलो भेंडीस १५० ते २५० असा दर मिळाला आहे. दोडक्याची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलो दोडक्यास २०० ते २८० असा दर मिळाला आहे. वांग्याची १३ क्विंटल आवक झाली असून दहा किलो वांग्यास २०० ते २५० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ८८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस ६० ते ११० असा दर मिळाला आहे.

फ्लाॅवरची १४ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला १०० ते १५० असा दर मिळाला आहे. हिरवी मिरची व ढोबळी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. हिरव्या मिरचीची २४ क्विंटल आवक होऊन दहा किलो मिरचीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे.

ढोबळी मिरचीची १२ क्विंटल आवक होऊन दहा किलो ढोबळीस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. कोथीबिर तेजीत असून आहे, कोथिबीरीची २७०० जुड्याची आवक होऊन कोथिंबीरीस शेकड्यास ६०० ते ८०० असा दर मिळाला आहे. मेथीची २००० जुड्याची आवक झाली असून मेथीस शेकड्यास ७०० ते ९०० असा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com