सातारा जिल्ह्यात रब्बीची ३९ टक्के पेरणी
सातारा जिल्ह्यात रब्बीची ३९ टक्के पेरणी

सातारा जिल्ह्यात रब्बीची ३९ टक्के पेरणी

सातारा  जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १) ३८.७८ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीचा दमदार पावसाने पेरणी पोषक वातावरण झाल्याने पेरणीची कामे वेगात सुरू आहेत. या हंगामात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र दोन लाख १५ हजार १३५ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) ८३ हजार ४२० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माण तालुक्‍यात सर्वाधिक २२ हजार ६२२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३५ हजार ७४५ हेक्‍टर असून, त्यापैकी ७५ हजार ५१७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार १७८ हेक्‍टर असून, त्यापैकी चार हजार ६२० हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.  मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ८३५ हेक्‍टर असून, एक हजार ८१७ हेक्‍टर क्षेत्रावर मक्‍याची लागवड झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ३९७ हेक्‍टर असून, त्यापैकी एक हजार ४१९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी हंगाम हा माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍याचा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. चालू हंगामाच्या उसाची लागवड सुरू असून, जिल्ह्यात तीन हजार ८६९ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com