साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये

साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३०० रुपये

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १४) शेवगा तेजीत असून फ्लॅावर, दोडका, कारली, भेंडी, गवारी, मेथी, कोथिंबीरच्या आवकेत वाढ झाली आहे. शेवग्याची १३ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास २५० ते ३५० असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या (ता. १२) तुलनेत दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वांग्याची २० क्विंटल आवक झाली असून दहा किलो वांग्यास १५० ते २०० असा दर मिळाला आहे. हिरवी मिरचीची ३७ क्विंटल आवक होऊन दहा किलो मिरचीस २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. ढोबळी मिरचीची १४ क्विंटल आवक झाली असून दहा किलो ढोबळीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे.

वाटाण्याची ४० क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. पावट्याची १८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो पावट्यास १५० ते २०० असा दर मिळाला आहे. वाल घेवड्यास तीन क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. ओल्या भुईमूग शेंगेची चार क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेंगेस ४०० ते ४५० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ५२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस ८० ते १०० असा दर मिळाला. फ्लॅावर, दोडका, कारली, भेंडी, गवारीच्या आवकेत वाढ झाली आहे. फ्लॅावरची ३८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला १०० ते १५० असा दर मिळाला आहे. दोडक्याची २३ क्विंटल आवक झाली असून दहा किलो दोडक्यास १०० ते १५० असा दर मिळाला आहे.

कारल्याची २५ क्विंटल आवक झाली असून १५० ते २०० असा दर मिळाला आहे. भेंडीची ३६ क्विंटल आवक झ्राली असून दहा किलो भेंडीस १०० ते १५० असा दर मिळाला. गवारीची ५० क्विंटल आवक झाली असून दहा किलो गवारीस १०० ते २०० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यात मेथी, कोथिंबीरच्या आवकेत वाढ झाली. मेथीची १००० जुड्यांची आवक झाली असून जुड्याच्या प्रति शेकड्यास ५०० ते ७०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची २५०० जुड्याची आवक झाली असून कोथिंबिरीची प्रति शेकड्यास २०० ते २५० असा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com