agriculture news in marathi, Satara Vegetable rates in APMC | Agrowon

साताऱ्यात भेंडी २०० ते २५० रुपये दहा किलो
पीटीआय
गुरुवार, 17 मे 2018

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) भेंडी, वाटाणा, काकडी, काळा घेवडा तेजीत असून वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. भेंडीची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) भेंडी, वाटाणा, काकडी, काळा घेवडा तेजीत असून वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. भेंडीची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वाटाण्याची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलो वाटाण्यास ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. वाटाण्यास रविवारच्या (ता. १३) तुलनेत दहा किलोमागे १०० रुपयांची दरवाढ झाली अाहे. काकडीची २१ क्विंटल आवक होऊन दहा किलो काकडीस १०० ते २०० असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. भेंडी, काकडी, काळा घेवड्यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. ढोबळी मिरचीची २० क्विंटल आवक झाली असून दहा किलो ढोबळीस २०० ते २५० दर मिळाला. पावट्याची एक क्विंटल आवक होऊन पावट्यास दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे.

ओल्या भुईमूग शेंगेची १४ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेंगेस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. शेवग्याची १० क्विंटल होऊन दहा किलो १५० ते २०० असा दर मिळाला आहे. गवारीची सात क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २०० दर मिळाला आहे. वांगी, दोडका, हिरवी मिरचीच्या आवकेत वाढ झाली आहे. वांग्याची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ८० ते १२० असा दर मिळाला आहे. दोडक्‍याची पाच क्विंटल आवक होऊन दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. हिरव्या मिरचीची २६ क्विंटल आवक झाली असून दहा किलो मिरचीस १०० के १५० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यांत मेथीची एक हजार जुड्यांची आवक झाली असून मेथीस शेकड्यास १००० ते १२०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची १३०० जुड्यांची आवक झाली असून कोथिंबिरीस शेकड्यास ८०० ते १००० असा दर मिळाला आहे.

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...
परभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
नागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...
औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...
जळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...
केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...
पुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवकपुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे...