agriculture news in Marathi, sate sukanu samiti meeting in Nagar on saturday, Maharashtra | Agrowon

‘राज्य सुकाणू समितीची शनिवारी नगरला बैठक’
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नगर ः शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीनतर्फे शहीद दिनापासून (२३ मार्च) राज्यव्यापी ‘हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रा’ काढली जाणार आहे. त्यानुसार आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राज्य सुकाणू समितीची शनिवारी (ता. २४) नगरला बैठक होणार असून, नगर जिल्ह्याच्या प्रश्‍नाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, किसान सभेचे सरचिटणीस बन्सी सातपुते यांनी दिली.

नगर ः शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीनतर्फे शहीद दिनापासून (२३ मार्च) राज्यव्यापी ‘हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रा’ काढली जाणार आहे. त्यानुसार आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राज्य सुकाणू समितीची शनिवारी (ता. २४) नगरला बैठक होणार असून, नगर जिल्ह्याच्या प्रश्‍नाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, किसान सभेचे सरचिटणीस बन्सी सातपुते यांनी दिली.

नगरच्या सरकारी विश्रामगृहावर होणाऱ्या बैठकीत समविचारी संघटनांच्या बैठकीत इच्छुक इतर संघटनांचा जिल्हा सुकाणू समितीत समावेश करणे, सुकाणू समितीची फेररचना करणे, आंदोलन काळात जिल्ह्यातील कार्यक्रमाची आखणी करणे, नियोजन करून जबाबदाऱ्या सोपविणे, आदी महत्त्वपूर्ण निर्णय करण्यात येणार आहेत.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व सुकाणू समितीचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथदादा पाटील, आमदार बच्चू कडू, समन्वयक डॉ. अजित नवले, डॉ. बाबा आढाव, नामदेव गावडे, सुशीलाताई मोराळे, कालिदास आपेट, डॉ. अशोक ढवळे, प्रतिभाताई शिंदे, करण गायकर, किशोरजी ढमाले, गणेशकाका जगताप, संजय पाटील घाटनेकर, शिवाजीनाना नांदखिले, अजय महाराज बारस्कर, संजीव भोर, अनिल देठे, संतोष वाडेकर, राजूभाऊ देसले, डॉ. विश्वास उटगी, सचिन धांडे, सुभाष काकूस्ते, एस. बी. नाना पाटील, विठ्ठलराव पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा सुकाणू समितीशी संलग्न असणाऱ्या शेतकरी संघटना, प्रहार संघटना, महाराष्ट्र किसान सभा, भारतीय किसान सभा, शिवप्रहार संघटना, छावा क्रांतिवीर सेना, शेकाप, लाल निशाण शेतकरी कष्टकरी संघटना, हमाल मापडी महामंडळ, सत्यशोधक शेतकरी सभा, बळिराजा शेतकरी संघ, भूमिपुत्र संघटना, बळिराजा संघटना, आम आदमी शेतकरी आघाडी, क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेड, लोकसंघर्ष मोर्चा, शेतकरी संघर्ष समिती, प्रहार शेतकरी वारकरी संघटना, आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभागी व्हावे, असे पटारे म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...