मतदारसंघात एकदाही प्रचार न करणारे सतीश जारकीहोळी विजयी

मतदारसंघात एकदाही प्रचार न करणारे सतीश जारकीहोळी विजयी
मतदारसंघात एकदाही प्रचार न करणारे सतीश जारकीहोळी विजयी

यमकनमर्डी : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर यमकनमर्डी मतदारसंघात एकदाही प्रचार न करणाऱ्या कॉंग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी अखेर आपला गड राखला. गेल्यावेळी एकहाती विजय मिळवलेल्या जारकीहोळींना यंदा विजयासाठी भाजप उमेदवार मारूती अष्टगी यांच्याशी झगडावे लागले. सुरवातीपासून संघर्ष असला तरी, जारकोळींच्याच गळ्यात विजयाची माळ पडली.  उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात एकदाही प्रचार न करणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनी अखेर आपला गड राखला. गेल्यावेळी एकहाती विजय मिळवलेल्या जारकीहोळींना यंदा विजयासाठी भाजप उमेदवार मारूती अष्टगी यांच्याशी झगडावे लागले. सुरवातीपासून संघर्ष असला तरी, जारकोळींच्याच गळ्यात विजयाची माळ पडली.  बेळगाव तालुक्‍याचा काही भाग आणि हुक्‍केरी तालुक्‍याचा काही भाग यामुळे या मतदारसंघात मराठी आणि कन्नड भाषिकांचा सहभाग आहे. मतदारसंघात मराठी मते निर्णायक होती. अनुसुचित जाती वर्गासाठी राखीव असलेल्या या मतदानसंघात गेल्या दोनवेळेपासून सतीश जारकीहोळी आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची या मतदारसंघावर पकड असली तरी गेल्यावेळी त्यांच्याविरोधात उभे राहिलेले मारुती अष्टगी यांनी गेल्या पाच वर्षात भाजप बळकटीसाठी प्रयत्न केला. त्यामुळे, यावेळी जारकीहोळी यांच्यासमोर चांगलेच आव्हान निर्माण झाले होते. निवडणूक तोंडावर येईपर्यंत सतीश जारकीहोळी यांना त्यांचे बंधू लखन जारकीहोळी यांनी आव्हान दिले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. प्रसंगी भाजपशी हात मिळवणीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जारकीहोळी यांना घरचा विरोध मोडून काढत मतदारसंघ अबाधित ठेवण्याचे आव्हान होते. 

आपला मतदारांवर विश्‍वास असून मतदारसंघात एकदाही प्रचार करणार नाही, असे जारकीहोळी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते एकदाही मतदारसंघात फिरले नाहीत. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत सदस्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांवर त्यांनी प्रचाराची धुरा सोपवली होती. त्यानुसार प्रचार झाला. पण, भाजप उमेदवार अष्टगी यांनी आक्रमक प्रचार केला. भाजपचे अनेक स्टार प्रचारक या मतदारसंघात होते. त्यामुळे, जोरदार टक्‍कर होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार कॉंटे की टक्‍कर झाली आणि यात सतीश जारकीहोळी यांनी सुमारे सहा हजार मतांनी यात बाजी मारली. 

मतांची आकडेवारी 

  • सतीश जारकीहोळी : 73,323 
  • मारुती अष्टगी : 70,506 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com