agriculture news in marathi, save goat from heatwave | Agrowon

उन्हाळ्यात जपा शेळ्यांना
डॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील
बुधवार, 18 एप्रिल 2018

उन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे आजार होतात. यामध्ये वजन कमी होणे, उष्माघात, मांस उत्पादन घटणे इत्यादी. या समस्या टाळण्यासाठी शेळ्यांच्या अाहाराचे अाणि अारोग्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे अावश्‍यक अाहे.

उन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे आजार होतात. यामध्ये वजन कमी होणे, उष्माघात, मांस उत्पादन घटणे इत्यादी. या समस्या टाळण्यासाठी शेळ्यांच्या अाहाराचे अाणि अारोग्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे अावश्‍यक अाहे.

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. असला तरी योग्य प्रमाणात नसतो. त्यामुळे शेळ्यांना आवश्‍यक असे पोषणतत्त्वे मिळत नाहीत. बहुतांश शेळीपालक शेळ्या दिवसभर बाहेर चरून अाल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात. या पद्धतीमध्ये जो चारा उपलब्ध आहे तोच चारा शेळ्यांना मिळतो. त्यामुळे आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक शेळ्यांना मिळतीलच हे सांगता येत नाही.

शेळ्यांचा आहार

 • शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची आवश्‍यकता असते.
 • उपलब्ध हिरवा चारा शेळ्यांना द्यावा. मांसवाढीसाठी पूरक घटक चाऱ्यामधून मिळत नाहीत. म्हणून चाऱ्यामध्ये इतर घटकांचा वापर करावा जसे की क्षार मिश्रण, प्रतिजैविके इ.
 • चाऱ्यासोबत विकरांचा वापर केल्यास चाऱ्याची पचनीयता वाढते. त्यामुळे शरीराला पौष्टिक घटक मिळून मांस उत्पादन वाढण्यास मदत होते.
 • प्रोबायोटिक्‍सच्या वापरामुळे ओटीपोटाला आवश्‍यक असणारे सूक्ष्म जीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढते तसेच शेळीची प्रकृती चांगली राहते.
 • अाहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

शेळ्यांची चरण्याची वेळ

 • उन्हाळ्यात ११ ते ४ या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते.
 • शेळ्यांना सकाळी लवकर (६ ते ९) किंवा (रात्री ५ ते ७) या वेळेत चरण्यासाठी सोडावे. चरून आल्यानंतर शेळ्यांना सावलीतच बांधावे.
 • चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्‍यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाऊ घातलेला उत्तम. उन्हाळ्यात चाऱ्यासाठी दूरवर भटकंतीमुळे गरजेप्रमाणे पोषणतत्त्वे न मिळाल्यामुळे शेळ्यांची प्रकृती खालावते.
 • शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. २४ तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.

गोठ्यामध्ये घ्यावयाची काळजी

 • गोठ्यातील जागा स्वच्छ असावी. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
 • उन्हाळ्यात शेळ्यांना गोठ्यात पुरेशी जागा किंवा जास्त जागा उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमानात वाढ होत नाही.
 • गोठ्याभोवती उंच सावली देणारी झाडे असल्यास गोठ्यातील व गोठ्याभोवतीचे वातावरण थंड राहते.
 • उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्‍यक आहे.
 • ज्या शेळ्यांचे केस लांब वाढलेले आहेत त्यांची उन्हाळ्यामध्ये कापणी करावी.

उन्हाळ्यातील लसीकरण

 • आंत्रविषार ः वर्षातून एकदा एप्रिलमध्ये (दोन मात्रा पंधरा दिवसांच्या अंतराने द्याव्यात.)
 • लाळ्या व खुरकूत ः मार्च किंवा एप्रिल महिन्यात.
 • घटसर्प ः वर्षातून एकदा मार्च-एप्रिल महिन्यात.
 • लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर इलेक्‍ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. यामुळे शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही.

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूक करताना पुढील काळजी घ्यावी.

 • शेळ्यांची वाहतूक कमीत कमी अंतरावर करावी.
 • ट्रकमध्ये शेळ्या वाहून नेताना वाहनामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
 • उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची गाभण काळातील शेवटच्या टप्प्यात लांबवर वाहतूक कमी करावी.
 • वाहतुकीवेळी वाहन ठराविक अंतरावर थांबवून शेळ्यांची पाहणी करावी.
 • वाहन थांबवल्यानंतर शेळ्यांना पुरेसा चारा अाणि पाणी द्यावे.

संपर्क : डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...
वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...