agriculture news in marathi, To save the officers Companies in trape | Agrowon

अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कंपन्यांना अडकविण्याचा डाव
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे : ठिबक गैरव्यवहारात अडकलेल्या कृषी अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कंपन्यांनाच अडकविण्याचा डाव कृषी खात्यात रचला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय या गैरव्यवहारात सहभागी असलेले कृषी खातेच या प्रकरणाची कशी काय चौकशी करू शकते, असा सवालही विचारला जात आहे.

पुणे : ठिबक गैरव्यवहारात अडकलेल्या कृषी अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कंपन्यांनाच अडकविण्याचा डाव कृषी खात्यात रचला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय या गैरव्यवहारात सहभागी असलेले कृषी खातेच या प्रकरणाची कशी काय चौकशी करू शकते, असा सवालही विचारला जात आहे.

राष्ट्रीय सिंचन अभियानात २००७ ते २०१२ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यात ठिबक घोटाळा झालेला आहे. या प्रकरणी डॉ. सु. ल. जाधव समिती आणि विजयकुमार इंगळे समितीच्या अहवालात या गैरव्यवहाराला जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी, वितरक आणि कंपन्यांची नावे आहेत. ठिबक घोटाळ्याचा शोध घेण्यासाठी लागोपाठ चार समित्या कृषी खात्याने नेमल्या होत्या. या समित्यांचे अहवाल कोणतीही ठोस माहिती न देणारे आहेत.

गैरव्यवहारात जबाबदार असलेल्या कंपन्यांवर पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यापूर्वी कंपन्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. पुढील आठवड्यात काही कंपन्यांची सुनावणी होत आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे सांगितले जात असताना चौकशी मात्र याच खात्याचे अधिकारी कसे काय करू शकतात, दोषी असलेल्या खात्याची सुनावणी पुन्हा त्याच खात्याकडून कशी केली जात आहे, त्रयस्थ यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी का गेली गेली नाही, ज्यांच्या कामकाजावर आक्षेप आहेत, त्याच अधिकाऱ्यांकडे चौकशी का सोपविली गेली, कनिष्ठांवर कारवाई आणि दोषी असलेल्या वरिष्ठांची पाठराखण का केली जाते, या प्रकरणाचे धागेदोरे वरपर्यंत असताना अधिकाऱ्यांऐवजी कंपन्यांना पुढे करण्याचे काय कारण, असे विविध प्रश्न या निमित्ताने चर्चिले जात आहेत.

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...