agriculture news in marathi, sawant says shetkari parishad in inthori today, Maharashtra | Agrowon

इंदोरी फाटा येथे आज शेतकरी परिषद ः सावंत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नगर ः केंद्रात व राज्यात सत्ता बदलली आहे. मात्र नगर जिल्ह्यामध्ये साखर आणि दुधात सम्राट असलेल्यांची सत्ता कायम आहे. शेतकऱ्यांच्या उसाला, दुधाला दर मिळू नये यासाठी हे लोक प्रयत्नशील असतात. त्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना करण्यासाठी इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे शुक्रवारी (ता. २८) शेतकरी परिषद होत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सांवत यांनी सांगितले.

नगर ः केंद्रात व राज्यात सत्ता बदलली आहे. मात्र नगर जिल्ह्यामध्ये साखर आणि दुधात सम्राट असलेल्यांची सत्ता कायम आहे. शेतकऱ्यांच्या उसाला, दुधाला दर मिळू नये यासाठी हे लोक प्रयत्नशील असतात. त्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना करण्यासाठी इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे शुक्रवारी (ता. २८) शेतकरी परिषद होत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सांवत यांनी सांगितले.

सावंत म्हणाले, की इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे होणाऱ्या शेतकरी परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, युवकचे अध्यक्ष हंसराज वडघुले, शर्मिला येवले, पूजा मोरे यांची उपस्थिती असेल. 

‘‘मुळात राज्यात व केंद्रात सत्ता बदलली, मात्र नगर जिल्ह्यामध्ये साखर सम्राटाची सत्ता कायम आहे. साखर आणि दूध सम्राट संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत आहेत. अकोले तालुक्‍यातील साखर कारखान्याने उसाला चांगला दर दिला. मात्र नगर जिल्ह्यामधील अन्य कारखानदार दर देऊ नये म्हणून दबाव टाकत आहेत. केंद्र सरकार दर देत नसल्याचा हे लोक कांगावा करत आहेत. शेतकऱ्यांना लुटून हे लोक त्यांच्या संस्था वाढवत असल्याचा आरोप करत यंदा केवळ नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी आणि जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी साखर सम्राटांना कोंडीत पकडण्यासाठीची व्यूहरचना करण्यासाठी ही शेतकरी परिषद होत आहे’’, असे सावंत यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...