agriculture news in marathi, SC bench asks Cong MPs to approach CJI on impeachment motion | Agrowon

नायडूंच्या निर्णयाला कॉंग्रेसकडून आव्हान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाची नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत कॉंग्रेसच्या दोन खासदारांनी सोमवारी (ता.७) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महाभियोगाची नोटीस देण्यात कोणतीही गैरवर्तणूक नव्हती, असा दावा या खासदारांनी केला आहे.

नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाची नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत कॉंग्रेसच्या दोन खासदारांनी सोमवारी (ता.७) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महाभियोगाची नोटीस देण्यात कोणतीही गैरवर्तणूक नव्हती, असा दावा या खासदारांनी केला आहे.

प्रतापसिंह बाजवा (पंजाब) आणि अमी हर्षदराय याज्ञिक (गुजरात) या राज्यसभेतील कॉंग्रेसच्या दोन खासदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती वरिष्ठ वकील आणि कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली. यावर याबाबतचा अधिकार सरन्यायाधीशांचा असल्याने त्यांच्यासमोर ही याचिका दाखल करावी, अशी सूचना वरिष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्‍वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सिब्बल आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना केली. न्या. एस. के. कौल यांचा या खंडपीठात समावेश होता. मात्र, सरन्यायाधीशांच्या या अधिकाराबाबत माहिती असली, तरी महाभियोगाची नोटीस त्यांच्याच विरोधात असल्याने त्यांच्यानंतरचे ज्येष्ठ वकील याबाबतचा निर्णय घेऊ शकतात, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

अशा प्रकारची परिस्थिती पूर्वी कधीही आलेली नाही, त्यामुळे या याचिकेवर कोणते खंडपीठ निकाल देणार, याचा निर्णय न्यायालयाने देणे आवश्‍यक आहे, असा दावाही त्यांनी केला आणि सुनावणी कधी घेणार, कोण घेणार याबाबत काही तरी सांगावे, अशी विनंती केली. प्रशांत भूषण यांनीही हाच मुद्दा मांडला. यावर न्या. चेलमेश्‍वर आणि न्या. कौल यांनी सिब्बल आणि भूषण यांना मंगळवारी (ता. ८) येण्यास सांगितले. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सात विरोधी पक्षांनी गेल्या महिन्यात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे सादर केली होती. मात्र, ही नोटीस नायडू यांनी फेटाळून लावली होती. 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...