agriculture news in marathi, scam in compensation distribution, jalgaon, maharashtra | Agrowon

कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत; घोळ सुरुच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मी मागील २५ वर्षे पूर्वहंगामी कापूस घेत आहे. मागील वर्षी माझ्या दीड हेक्‍टर क्षेत्रावरील कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाली. मी मदतनिधीसंबंधी महसूल व कृषी विभागाकडे अर्ज दिला. पण माझे नावच मदतनिधीच्या यादीत आले नाही. पण आमच्याकडे जे शेतकरी घरी जमीन करीत नाही, जे आपली जमीन लीजवर देतात. कधी पूर्वहंगामी कापूस लावत नाहीत, त्यांना पूर्वहंगामी कापूस नुकसानीसंबंधी मदतनिधी मिळत आहे. हा प्रकार शासनाने गांभीर्याने घ्यावा.
- एक शेतकरी, कानळदा, जि. जळगाव.

जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना मदतनिधीचे वाटप सुरू झाले आहे. परंतु जळगाव, धरणगाव या तालुक्‍यांत मोठा घोळ झाला असून, ज्यांनी कापसाची लागवड केली नव्हती व स्वतः शेती न करणाऱ्या शेतकऱ्यांनाही हा निधी मिळाला आहे. मात्र जे शेतकरी वर्षानुवर्षे पूर्वहंगामी कापसाचे उत्पादन घेत आहेत त्यांचे नाव मदतनिधीच्या यादीतच नाही.

बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहिलेले शेतकरी बॅंक व तलाठी यांच्याकडे चकरा मारत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र निधीचे वितरण झाले. सर्वात शेवटी जळगाव व धरणगाव या तालुक्‍यांत वितरण सुरू झाले. परंतु वितरणात घोळ झाल्याने कापूस उत्पादकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. मध्यंतरी शेतकरी तक्रार करायचे, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधायचे, पण तहसीलदार ऐकून घेत नव्हते.

मोठ्या प्रतीक्षेनंतर निधी बॅंकांमध्ये आला, पण अनेक कापूस उत्पादकांनी अर्ज भरूनही, सर्व कागदपत्रे जोडूनही त्यांना हा  मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही शेतकरी बुधवारी (ता. १४) सायंकाळी तहसीलदार कार्यालयात गेले, पण तलाठी भेटले नाही. तलाठी यांचे संबंधित गावात काम पाहणारे झिरो तलाठी यांच्याकडे शेतकऱ्यांना जावे लागले. झिरो तलाठ्यांनी मात्र तलाठी यांची भेट घ्यावी लागेल, अशी हतबलता दाखविली. काही शेतकऱ्यांनी तलाठ्यांशी संपर्क साधला असता बॅंकेत संपर्क करा, आपले नाव तर यादीत आहे, बॅंक खाते क्रमांकही आहे, असे तलाठ्यांनी सांगितले. तर बॅंकेत मात्र आपले नावच यादीत नाहे, असे संबंधित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

जळगाव तालुक्‍यात कानळदा, भोकर, नांद्रा बुद्रूक, आव्हाणे तर धरणगावात पाळधी, सोनवद भागात शेतकऱ्यांच्या अधिक तक्रारी आहेत. यासंदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही प्रशासनाने करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...