agriculture news in marathi, scam of election officials in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात निवडणूक अधिकाऱ्यांचा मानधन घोटाळा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) देण्यात येणाऱ्या मानधन वाटपात आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीला अनेक धक्कादायक बाबी आढळल्या असून, शासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील काही सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनाही कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या नावावर पैसे लाटल्याचे उघड झाले आहे. या साऱ्या प्रकरणात दोषी असलेल्या एका नायब तहसीलदाराला मात्र पाठीशी घातले जात असल्याचेही कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) देण्यात येणाऱ्या मानधन वाटपात आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीला अनेक धक्कादायक बाबी आढळल्या असून, शासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील काही सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनाही कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या नावावर पैसे लाटल्याचे उघड झाले आहे. या साऱ्या प्रकरणात दोषी असलेल्या एका नायब तहसीलदाराला मात्र पाठीशी घातले जात असल्याचेही कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी पाचशेहून अधिक बीएलओंची नेमणूक करण्यात आलेली असून, त्यांच्या नावे दरवर्षी हजारो रुपयांचे मानधन बॅँक खात्यात जमा केले जात आहे. तथापि, दरवर्षी मानधन घेणाऱ्या बीएलओंकडून मात्र निवडणूक आयोगाचे काम केले जात नसल्याचे लक्षात आल्यावर चौकशी केली असता, बहुतांशी बीएलओ कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे बँक खात्यात पैसे जमा करून नंतर या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले होते.

यासंदर्भात मालेगाव तहसील कार्यालयातील सोनवणेनामक कर्मचाऱ्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कर्मचाऱ्याला अद्यापही पोलिसांनी अटक केली नसल्याचे व त्यामुळे त्याचे निलंबन रखडल्याचे बोलले जात असले तरी, या साऱ्या घोटाळ्यात निवडणूक नायब तहसीलदाराची महत्त्वाची भूमिका असून, त्याच्या संमतीशिवाय हा घोटाळा होऊच शकत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, त्याला सोयीस्कर पाठीशी घालण्यात येत असून, त्याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाला कळवूनही नायब तहसीलदार सहीसलामत सुटल्याचे सांगितले जात आहे.  

बीएलओंच्या मानधन घोटाळ्यात ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या सोनवणेचे नातेवाईक, पत्नी, मित्र, मैत्रिणींना कागदोपत्री बीएलओ दाखविण्यात आले, त्याचबरोबर काही पोलिस कर्मचाऱ्यांचीही नावे त्यात घुसडविण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...