agriculture news in Marathi, scarcity of foromon trap in Nagar, Maharashtra | Agrowon

नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कापसावर बोंड अळी पडू नये यासाठी कामगंध सापळे लावा असे सांगितले जात आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी मिळत नाही. शासनानेच असे सापळे उपलब्ध करून द्यायला हवे. यावर्षीही अनेक ठिकाणी बोंड अळी सापडली आहे. त्यामुळे आता होणारे नुकसान कसे रोखणार.
- शरद मरकड, शेतकरी, मढी ता. पाथर्डी

नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे वापरावेत असे अवाहन केले जात आहे. मात्र खते, बियाणे विक्री करणाऱ्या बहुतांश दुकानात कामगंध सापळे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामबंद सापळे नेमके मिळतात कोठे? याचीच शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही. काही दुकानात सापळे उपलब्ध होते, मात्र तेथेही आता टंचाई असल्याचे दिसत आहे.

नगर जिल्ह्यामध्ये गतवर्षी कापसावर बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे यंदा हा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासन स्तरावर अगदी सुरवातीपासूनच प्रयत्न सुरू होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही सातत्याने "बोंड अळीबाबत जागृती करा, प्रभावी उपाययोजना करा; पण बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखा,'' असे सातत्याने अवाहन केले होते. मात्र, तरीही नगर जिल्ह्यामधील राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव भागात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकरी धस्तावले आहेत.

ज्या भागात बोंड अळी आढळून आली, त्या ठिकाणी कृषी अधिकारी भेटी देत आहेत. मात्र, बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे वापरावेत, असे कृषी विभाग सातत्याने अवाहन करत आहे. मात्र, ते सापळे नमके भेटतात कुठे? याची बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. बाजारातही बहुतांश दुकानात ते उपलब्ध नाहीत. मध्यंतरी नगरमध्ये काही दुकानात प्रती पन्नास रुपयाला एक सापळा मिळत होता. आता तेथेही टंचाई आहे.

सापळे लावायचे कसे ?
बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे वापरण्याचे सुरवातीपासून सांगितले जात आहे. मात्र, ते लावायचे कसे याची अजूनही अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. गतवर्षीप्रमाणे यंदाही बोंड अळीचा प्रादुर्भात दिसून येत असताना कापूस लागवड केलेल्या पाच टक्के शेतकऱ्यांनीही कामगंध सापळे लावले नसल्याचे नगर जिल्ह्यामधील चित्र आहे.

प्रतिक्रिया
कृषी विभागाने प्रात्यक्षिकांतर्गत लागवड केलेल्या ठिकाणी शासनाने सापळे उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांसाठी कृषी दुकानदारांकडे कामगंध सापळे उपलब्ध करून दिले आहे. शिवाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री सुरू आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुमारे दीड लाख कामगंध सापळ्याची विक्री झालेली आहे. सापळे कसे लावायचे यांसह अन्य माहितीबाबत कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
- पंडीत लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
ज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...
गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी...प्रकाश संश्लेषणामध्ये हरितलवक आणि हरितद्रव्य...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...