agriculture news in marathi, scattered rain prediction in state, temperature to be rise | Agrowon

तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर मंगळवारी (ता. २०) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचे ढग दूर होताच राज्याच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी ३० अंशांच्या खाली आलेले तापमान पुन्हा तिशीपार पोचले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर मंगळवारी (ता. २०) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचे ढग दूर होताच राज्याच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी ३० अंशांच्या खाली आलेले तापमान पुन्हा तिशीपार पोचले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी दुपारनंतर ढग गोळा झाले होते. सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्रात, तर मंगळवारी आणि बुधवारी विदर्भात ढगाळ हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज अाहे. तर कोकणात हवमान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील कमाल तापमानात वाढ होत असली तरी, अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ तर विदर्भात २ ते ६ अंशांनी कमी असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारपासून विदर्भ वगळता राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार असल्याने कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८, नगर ३५.५, जळगाव ३६.८, कोल्हापूर ३२.१, महाबळेश्वर २८.२, मालेगाव ३६.६, नाशिक ३३.६, सातारा ३३.४, सोलापूर ३५.२, मुंबई ३१.७, अलिबाग ३१.६, डहाणू ३१.४, भिरा ३९.२, औरंगाबाद ३३.६, परभणी ३३.३, नांदेड ३७.०, अकोला ३६.६, अमरावती ३५.४, बुलडाणा ३४.५, ब्रह्मपुरी ३१.७, चंद्रपूर ३३.४, गोंदिया ३६.६, नागपूर ३५.१, वर्धा ३५.०, यवतमाळ ३३.०. 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...