agriculture news in marathi, School computerization from Wedding Expense | Agrowon

लग्नातील आहेरातून करणार शाळेचे संगणकीकरण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

सोलापूर : निसर्ग देवता प्रसन्न... चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठी योजिला विवाह, धर्मज्ञानी तयांचा..! या संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ओळींसोबतच हे मानवा जागा हो, जलसंधारण व वृक्षारोपणाचा धागा हो...! असा संदेश ढोराळे (ता. बार्शी) येथील चोरमुले कुटुंबीयांनी लग्नपत्रिकेतून दिला आहे. रोख स्वरूपातील आहेर स्वीकारून व स्वत:ची रक्कम घालून जिल्हा परिषद शाळा संगणकीकरण करण्याचा आगळावेगळा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला आहे.

सोलापूर : निसर्ग देवता प्रसन्न... चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठी योजिला विवाह, धर्मज्ञानी तयांचा..! या संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ओळींसोबतच हे मानवा जागा हो, जलसंधारण व वृक्षारोपणाचा धागा हो...! असा संदेश ढोराळे (ता. बार्शी) येथील चोरमुले कुटुंबीयांनी लग्नपत्रिकेतून दिला आहे. रोख स्वरूपातील आहेर स्वीकारून व स्वत:ची रक्कम घालून जिल्हा परिषद शाळा संगणकीकरण करण्याचा आगळावेगळा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला आहे.

शेतकरी असलेल्या सुधामती आणि बळिराम चोरमले यांचे चिरंजीव पवन यांचा विवाह येत्या रविवारी (ता. २४) होणार आहे. कृषी पदवी संपादन केलेले पवन हे सध्या सोलापुरात एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर पदावर कार्यरत आहे. त्यांचा विवाह दिवंगत नंदकिशोर वाघमोडे यांची कन्या पल्लवी हिच्यासोबत होणार असून, त्या डॉक्‍टर आहेत. लग्नकार्यात फटाके, बॅंडबाजासह इतर ठिकाणी होणारा अनावश्‍यक खर्च टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गावातील जिल्हा परिषद शाळा संगणकीकरण करण्यासाठी लग्नात आहेर म्हणून येणारी रक्कम व स्वत:ही काही रक्कम घालून मदत करण्यात येणार आहे. लग्नातील अक्षता सोहळाही आगळावेगळा असणार आहे. तांदळाची नासाडी न करता फक्‍त टाळ्या वाजविण्यात येणार आहेत.

लग्नपत्रिकेवर देवांची, महापुरुषांची, राजकीय नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केल्याचे आपण पाहिले असेल, पण चोरमले कुटुंबीयांनी लग्नपत्रिकेत बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छ भारत, डिजिटल स्कूल आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारी चित्रे प्रसिद्ध केली आहेत. अनावश्‍यक खर्च टाळून पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा लग्नसोहळा का केला.

याबाबतची माहिती देण्यासाठी एक बुकलेटही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लग्नाला येणाऱ्या मित्र आणि नातेवाइकांना ते देण्यात येईल. लग्नातील सामाजिक उपक्रमांसाठी मित्र प्रशांत पाटील, रवींद्र माने यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...