शाळकरी मुलींनी बांधावर बांधल्या शेतकऱ्यांना राख्या
शाळकरी मुलींनी बांधावर बांधल्या शेतकऱ्यांना राख्या

शाळकरी मुलींनी बांधावर बांधल्या शेतकऱ्यांना राख्या

श्रीरामपूर, यवतमाळ : शेतकरी आणि सैनिकांना कामाच्या व्यस्तत्येमुळे विविध सणाला मुकावे लागते. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवाला राखी बांधण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी बांधावर धाव घेतली. शाळेत राख्या तयार करून त्यांनी बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना राख्या बांधल्या.
जिल्हा परिषद शाळा वडसद (तांडा) येथील मुख्याध्यापक एस. बी. जमगडे व सहायक शिक्षक साहेबराव राठोड यांच्या संकल्पनेतून शाळेच्या माजी विद्यार्थिनी राखी जाधव, शीतल जाधव, सपना आढे, टिंकल आढे, दिव्या जाधव, रोशनी राठोड, गौरी राठोड, युगीता जाधव, वर्षा चव्हाण, सृष्टी आडे आदी चिमुकल्या बहिणी या वेळी उपस्थित होत्या. सेंच्युरी पेपर, कुंदन, टिकली, फेव्हिकॉल, रेशमी धागे अशा टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक राख्या तयार केल्या. अशाप्रकारे आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव या विद्यार्थिनींनी साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com