agriculture news in Marathi, The scurf of the leopards in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

नाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच माडसंगवी शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एक वासरू व एक पारडू ठार झाले. परिसरात बिबट्याचे ठसे आढळले. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर बिबट्याने हल्ला केल्याचे सिद्ध झाले आहे. 

नाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच माडसंगवी शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एक वासरू व एक पारडू ठार झाले. परिसरात बिबट्याचे ठसे आढळले. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर बिबट्याने हल्ला केल्याचे सिद्ध झाले आहे. 

मंडसंगवी शिवारातील डॉ. समीर पेखळे यांच्या घरापासून दोनशे मीटरवर असलेल्या गोठ्यात बिबट्याने हल्ला केला. सकाळी गोठ्याची पाहणी करत असताना वासरू व पारडू मृतावस्थेत आढळले. या बाबत वन विभागाला कळविण्यात आले. जवळच उसाचा मळा असल्याने लपला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे माडसंगवी परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

शहरातील आडगाव परिसर येथे यापूर्वी चार शेळ्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या होत्या. तसेच नाशिक तालुक्यात नानेगाव, बेलत गव्हाण, शेवगे दारणा तसेच निफाड तालुक्यात कारसुळ, रौळस, नारायण टेंभी, वडाळी नजीक परिसरात बिबट्याची दहशत आहे. याठिकाणी ही शेळी, कुत्रे यांच्यावर हल्ले झाले आहेत. 

मागील आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला आहे.  परमोरी परिसरात वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे. पशु तसेच माणसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वेळीच वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.

अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार
परमोरी येथे गेल्या सहा महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांत वनविभागाने बिबटे जेरबंद केले नाहीत, तर येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर पोलिस यंत्रणा व वन विभागाला कळविण्यात येते. अशा वेळी पोलिस यंत्रणा वेळेवर हजर होते. मात्र, वन विभाग वेळेवर हजर न होता हलगर्जीपणा करते. बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही. तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आहे.
- बाळासाहेब काळोगे, माजी सरपंच, परमोरी, ता. दिंडोरी

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ४५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील ३६...पुणे   : उन्हाच्या झळा वाढत असल्याने...
जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘...नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी...
शिरुर तालुक्यात रानडुकरांकडून उभ्या...रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्‍...
पाथर्डी, पारनेरमध्ये सर्वाधिक टॅंकरने...नगर : जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर परिणाम...
राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही...नगर  : मुस्लिम समाजाला भीती दाखविण्यासाठी...
सातारा जिल्ह्यात ३३६५ हेक्टरवर उन्हाळी...सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र...
पाणीपुरवठ्यासाठी खानदेशात ५०७ विहिरी...जळगाव : पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात सुमारे...
स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीवर शेतकऱ्यांनी भर...भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या...
अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी; तर...जालना ः  पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल...
मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सोडविणार :...पैठण, जि. औरंगाबाद   : पश्चिम घाटातून...
मोदीजी, महाराष्ट्र तुम्हाला धडा...मुंबई : आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील...
दुष्काळाच्या हद्दपारीसाठी परदेशातूनही...गोंदवले, जि. सातारा : दुष्काळ हद्दपार करण्यासाठी...
अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा...अकोला  : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...