agriculture news in marathi, This is the season gone, the next worry | Agrowon

यंदाचा हंगाम गेलाच, पुढच्याची चिंता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : मुख्य नगदी पीक कपाशीवर यंदा शेंदरी बोंडअळीचा झालेला आघात शेतकऱ्यांना असहनीय झाला आहे. यंदाचा हंगाम गेला, पुढच्या हंगामाचे काय याचीदेखील शेतकऱ्यांना चिंता आहे. काही शेतकऱ्यांनी त्यासाठी बैठका घेऊन नेमके काय करावे याविषयी मंथन सुरू केले आहे. तसेच जी फॉर्मच्या माध्यमातून आपले नुकसान सरकारच्या दरबारी मांडण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.

औरंगाबाद : मुख्य नगदी पीक कपाशीवर यंदा शेंदरी बोंडअळीचा झालेला आघात शेतकऱ्यांना असहनीय झाला आहे. यंदाचा हंगाम गेला, पुढच्या हंगामाचे काय याचीदेखील शेतकऱ्यांना चिंता आहे. काही शेतकऱ्यांनी त्यासाठी बैठका घेऊन नेमके काय करावे याविषयी मंथन सुरू केले आहे. तसेच जी फॉर्मच्या माध्यमातून आपले नुकसान सरकारच्या दरबारी मांडण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.

मराठवाड्यात सरासरी ९१ टक्‍के अर्थात १५ लाख ६४ हजार ९४ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. खरिपाची जवळपास सर्वच पिके गेल्यानंतर प्रदीर्घ खंडानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची सोय केली. त्यामुळे काहीअंशी उत्पादनाची आशा निर्माण झाली.

परंतु शेंदरी बोंडअळीने शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फेरले आहे. नुकसान व उपस्थित झालेल्या प्रश्नांना अनुसरून पंचानामे कधी होतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याविषयी माहिती दिली त्यांची प्रत्यक्ष शहानिशा करण्याची तसदी जिल्हा परिषद व शासनाच्या कृषी विभागाकडून घेतली गेली नसल्याचे  शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करून तंत्रज्ञान चुकीचे दिलेय की ते वापरताना चूक झाली यासाठी शासन, प्रशासन व शास्त्रज्ञांच्या माध्यमातून समन्वयाने मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

कृषी विकास शेतकरी बचत गटाचा पुढाकार
जालना जिल्ह्यातील पाच गावांत काम करणाऱ्या कृषी विकास शेतकरी बचत गटाने यंदाचे नुकसान भरून काढण्यासाठी नेमके काय करायचे, शासन दरबारी कसा लढा द्यायचा, पुढील हंगाम सुरक्षित करायचा, सरकारने, तज्ज्ञांनी यावर तोडगा काढण्यासाठी नेमके काय करायला हवे, यांसह जी फॉर्म भरून देण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय १५ नोव्हेंबरला झालेल्या गटाच्या बैठकीत घेतला.

आमच्या गटाने जी फॉर्म भरून देऊन नुकसानभरपाई मिळावी यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतला. पर्यायी पीक नसल्याने तज्ज्ञांनी पुढील हंगाम सुरक्षित होईल यासाठी उपाय योजावेत.
- निवृत्ती घुले, अध्यक्ष कृषी विकास शेतकरी बचत गट, वखारी, जि. जालना.

 

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...