agriculture news in marathi, Second cloned buffalo success by CIRB scientist | Agrowon

आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वी
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018

हिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी आसामी म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यासाठी क्लोन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. ‘सच-गौरव` असे या नर रेडकाचे नामकरण करण्यात आले आहे. 

हिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी आसामी म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यासाठी क्लोन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. ‘सच-गौरव` असे या नर रेडकाचे नामकरण करण्यात आले आहे. 

केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. इंद्रजित सिंह यांनी ही माहिती दिली. डॉ. सिंह म्हणाले, की आसामी म्हशी या केवळ ईशान्य भारतातच आढळतात. या म्हशींचा वापर प्रामुख्याने शेती कामासाठी केला जातो. केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेमध्ये ११ डिसेंबर २०१५ मध्ये क्लोन तंत्रज्ञानाचा वापर करून पहिले नर रेडकू जन्मले होते. या रेडकाचे नाव ‘हिस्सार गौरव` असे ठेवण्यात आले होते. बावीस महिन्यांच्या या नर रेडकाच्या रेतमात्रांचा वापर करून दहा म्हशींमध्ये गर्भधारणा झाली होती.

क्लोन तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना संस्थेतील तज्ज्ञ डॉ. पी. एस. यादव म्हणाले, की आसाममधील खन्नापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील आसामी म्हशीच्या पेशींचे घटक क्लोनिंगसाठी आमच्या प्रयोगशाळेत आणण्यात आल्या. त्यानंतर योग्य तंत्रज्ञानाचा वापर करत मुऱ्हा म्हशीच्या गर्भाशयात या भृणाचे प्रत्यारोपण करण्यात आले. कमी होत जाणाऱ्या जातिवंत जनावरांच्या संवर्धनासाठी तसेच कमी कालावधीमध्ये नवीन पिढी विकसित करण्यासाठी क्लोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. 

क्लोन तंत्रज्ञानासाठी सिरसा जवळील ‘हाय टेक सच’ डेअरी फार्ममधील मुऱ्हा जातीच्या म्हशीची निवड करण्यात आली होती. या तंत्रज्ञानातून पहिले नर रेडकू २२ डिसेंबर रोजी जन्माला आले. जन्मतेवळी नर रेडकाचे वजन ५४.२ किलो होते. रेडकाच्या रक्त आणि सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. या संशोधनामध्ये डॉ. एन. एल. सेलोकर, डॉ. धर्मेंद्र कुमार, डॉ. आर. के. शर्मा आणि डॉ. सुधीर खन्ना यांचा सहभाग होता.

सरोगेटेड मदर
क्लोन तंत्रज्ञानाआधारे आसामी रेडकू 'सच-गौरव' याचा जन्म झाला असला, तरी या प्रयोगात सरोगेटेड मदर म्हणून मुऱ्हा म्हशी वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानातून येत्या काळात जातिवंत आसामी रेडे विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली. 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी?जी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...
पंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
उन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...
तंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...
‘चंद्र’पूर तापलेलेच ! ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...
ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...
धुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे  ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...
बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...
ठरलं...दूध फुकट घालायचं ! लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...
तूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...
योग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...
भिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...