agriculture news in marathi, On the second day of the exhibition of 'Agrotech' housefull | Agrowon

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ॲग्रोटेक’ गर्दीने फुलले
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ॲग्रोटेक २०१७’ या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने छोटे-छोटे प्रयोग, शेती उपयोगी साधने बघण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले.  विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या दालनात शेतातील कचऱ्यापासून कंपोस्ट कशा पद्धतीने तयार करावे याची तंत्रशुद्ध माहिती दिली जात अाहे. दिवसेंदिवस जमिनीचे अारोग्य हा विषय महत्त्वाचा होत चालला अाहे. त्यामुळे या ठिकाणी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण फॉस्फो कंपोस्ट तयार करण्यासाठीचे मॉडेल ठेवण्यात अाले. त्याची माहिती डॉ. एस. डी.

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ॲग्रोटेक २०१७’ या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने छोटे-छोटे प्रयोग, शेती उपयोगी साधने बघण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले.  विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या दालनात शेतातील कचऱ्यापासून कंपोस्ट कशा पद्धतीने तयार करावे याची तंत्रशुद्ध माहिती दिली जात अाहे. दिवसेंदिवस जमिनीचे अारोग्य हा विषय महत्त्वाचा होत चालला अाहे. त्यामुळे या ठिकाणी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण फॉस्फो कंपोस्ट तयार करण्यासाठीचे मॉडेल ठेवण्यात अाले. त्याची माहिती डॉ. एस. डी. जाधव, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. डी. व्ही. माळी, डॉ. नितीन कोंडे, देवेन देशमुख, सूरज लाठे, एमएस्सी व पीएचडीचे विद्यार्थी माहिती देत अाहेत. 

या वर्षी या विभागाने पीक अवशेष व्यवस्थापन व जाळल्याचे दुष्पपरिणाम या थीमवर मॉडेल तयार केले अाहे. त्यातून शेतकऱ्यांना अवशेषांचे महत्त्व पटवून देण्यात येते. सोबतच या अवशेषांचा अाच्छादनासाठी, फॉस्फो कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर अाणि माती नमुने कसे घ्यावेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत अाहे.

विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाने अखिल भारतीय समन्वयित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पांतर्गत लावलेल्या दालनात विविध पिकांतील तण व्यवस्थापनाबाबत साध्या सोप्या पद्धतींची माहिती दिली जात अाहे. डाॅ. जयंत देशमुख, डॉ. संजय काकडे, मंगेश सोळंके यांच्यासह या शाखेचे विद्यार्थी शेतकऱ्यांना विविध पद्धती, कीटकांचा वापर याबाबत सविस्तर माहिती देत अाहेत. विद्यापीठाच्या विविध शाखांच्या दालनांसह संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कंपन्यांच्या दालनांमध्येही दुसऱ्या दिवशी गर्दी झाली होती.

पथनाट्यातून उलगडली उन्नत शेतीची संकल्पना
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘गाेष्ट मातीची अन् उन्नत शेतीची’ संकल्पना पथनाट्यातून सादर केली. याला दर्शकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रदर्शनस्थळी कृषी महाविद्यालयाच्या मृदा शास्त्र व कृषी रसायन शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘गाेष्ट मातीची अन् उन्नत शेतीची’ पथनाट्य सादर केले. यामध्ये शेतीची परिस्थिती, त्यातून उद्‍भवणाऱ्या समस्या, शेतकऱ्यांची दशा मांडण्यात अाली. कीटकनाशकांच्या फवारणीतून होणारे घातक परिणामसुद्धा सादर केले. शासकीय याेजनांचा लाभ आणि त्यातून उन्नत शेती कशी साधता येईल हेसुद्धा विद्यार्थ्यांनी सादर केले.

अाज समारोप
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ॲग्रोटेक’ या कृषी प्रदर्शनाचा शुक्रवारी (ता. २९) समारोप होणार अाहे. दुपारी २ ते ३ या वेळेत ॲड. अनंत खेळकर यांचा कृषी कट्टा, दुपारी ३ ते ४ या वेळेत जमिनीचे अारोग्य व्यवस्थापन विषयावर डॉ. अार. एन. काटकर बोलतील. दुपारी ४ ते ५ या वेळेत राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत समारोप होईल. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले, खासदार संजय धोत्रे, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी यांची उपस्थिती राहील.

 

इतर बातम्या
हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत...घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक...औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...