agriculture news in marathi, Second day of farmers' agitation; vegetables prices soar | Agrowon

पंजाब, हरियाणात शेतकरी संपाला धार
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

चंदीगड : शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला पंजाब, हरियाणासह विविध राज्यांत दुसऱ्या दिवशीही चांगलीच धार होती. या राज्यातील प्रमुख शहारांकडे जाणारा दूध, भाजीपाला अनेक भागांत रोखण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या या आंदोलनात सात पेक्षा अधिक राज्यांतील शेतकऱ्यांनी अनेक भागात रास्ता रोको आंदोलन केले. 

चंदीगड : शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला पंजाब, हरियाणासह विविध राज्यांत दुसऱ्या दिवशीही चांगलीच धार होती. या राज्यातील प्रमुख शहारांकडे जाणारा दूध, भाजीपाला अनेक भागांत रोखण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या या आंदोलनात सात पेक्षा अधिक राज्यांतील शेतकऱ्यांनी अनेक भागात रास्ता रोको आंदोलन केले. 

केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध या वेळी करण्यात अाला. पहिल्या दिवशी शहरातील भाजीपाला विक्री दरातही फरक जाणवला नसला, तरी दुसऱ्या दिवशी प्रति किलो १० ते २० रुपयाने दरात वाढ झाली. बटाटा, ढोबळी मिरची, कारले, काकडी आदींचा काही प्रमाणात तुटवडा जाणवू लागला. दररोज येणाऱ्या आवकेत परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तसेच संप सुरूच राहिल्यास आगामी काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. 

पंजाबातील नाभा, लुधियाना, मुक्तसर, तरण तारण, नांगल, भटिंडा आणि फिरोजपूर या भागात आंदोलनाचा जोर अधिक आहे. शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला अाणि दूध रोखले आहे. भटिंडा येथे चार आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वरखा येथील दूध प्रकल्पातून दूध वितरणास ते विरोध करत होते. किसान एकता मंच आणि राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली येथे १ ते १० जून दरम्यान आंदोलन होत आहे. 

केंद्रातील भाजपप्रणित सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी गंभीर अडचणीत आला आहे. भयग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात केंद्र सरकार अपयशी झाले आहे. शेतकऱ्यांबरोबर सरकार वैरभावाने वागत आहे. हमीभावानुसार दर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झशले आहेत. स्वामिनाथन आयोगांच्या शिफारसींची अंमलबजावणी केली, तरच या देशातील शेती समस्येवर समाधान मिळू शकेल.
- कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री, पंजाब
 

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...