agriculture news in marathi, In the second phase, soybean percentage is high | Agrowon

मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यातही सोयाबीनचा टक्‍का अधिकच
संतोष मुंढे
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद : पावसाने डोळे वटारल्याने मराठवाड्यातील खरिपाच्या पेरणीला ब्रेक लागला आहे. पेरणीचा दुसरा टप्पा आटोपला असताना पेरणी झालेले कपाशीचे क्षेत्र अधिक असले तरी प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत झालेली तुलनात्मक आकडेवारी पाहाता कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचा टक्‍काच अधिक आहे.

औरंगाबाद : पावसाने डोळे वटारल्याने मराठवाड्यातील खरिपाच्या पेरणीला ब्रेक लागला आहे. पेरणीचा दुसरा टप्पा आटोपला असताना पेरणी झालेले कपाशीचे क्षेत्र अधिक असले तरी प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत झालेली तुलनात्मक आकडेवारी पाहाता कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचा टक्‍काच अधिक आहे.

यंदा मराठवाड्यात ४९ लाख ११ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्या तुलनेत १७ लाख ८७ हजार हेक्‍टरवरची पेरणी उरकली आहे. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात निम्मी पेरणी आटोपली असताना जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अजून प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत ३० टक्‍केही पेरणी आटोपली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ४१ टक्‍के तर बीड जिल्ह्यात ३५ टक्‍के पेरणी झाली आहे. पावसाच्या खोड्याने मराठवाड्यातील पेरणीला ब्रेक लावला.

शिवाय पेरणी झालेल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे ढग दाटून आल्याचे चित्र आहे. चारदोन ठिकाणी झालेल्या थोड्याबहूत पावसाचा अपवाद वगळता पंधरवड्यापेक्षा जास्त काळ पावसाने दडी मारलेल्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती बिकट आहे. यंदा मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र १० लाख ३८ हजार ८९० हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले होते. त्या तुलनेत ४ जुलैअखेर सोयाबीनची ६ लाख ४२ हजार ८४९ हेक्‍टरवर अर्थात ६१.८८ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. दुसरीकडे कपाशीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या १७ लाख १७ हजार ४५१ हेक्‍टरच्या तुलनेत ७ लाख ९ हजार ९९० हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

मराठवाड्यात कपाशीचे जिल्हे म्हणून औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, व नांदेडची ओळख. परंतु, या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत कपाशी लागवडीचा टक्‍का २७ ते ६२ टक्‍क्‍यांदरम्यान राहिला आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात प्रस्तावित १० लाख १४ हजार ६६७ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ३ लाख ९९ हजार ९०३ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात प्रस्तावित ७ लाख २ हजार ७८४ हेक्‍टरच्या तुलनेत ३ लाख १० हजार ८७ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. क्षेत्राच्या तुलनेत प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत खरीप ज्वारीची ९.८५ टक्‍के क्षेत्रावर, बाजरीची ११ टक्‍के, मकाची ३६ टक्‍के तुरीची १७ टक्‍के, मुगाची ३० टक्‍के, उडिदाची २८ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

इतर खरीप पिकांची प्रस्तावित प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
पीक प्रस्तावित प्रत्यक्ष
खरीप ज्वारी ४१७५१५ ४१११२
बाजरी २३४९८० २६३६२
मका २५३६६८ ९३२९५
तूर ५२०९४७ १५६५७८
मूग १६२००९ ६१४१३
उडीद १६७३५१ ४७०९७
तीळ २१५८८ १५०४
कारळ ९६२९ ५१३
खरीप सूर्यफूल ३०३३१ ६४१
खरीप भुईमूग २२४३४ २९५२
सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा प्रस्तावित क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
लातूर २७४०७९ १०६९९७
उस्मानाबाद १०६९६२ ४९६३०
नांदेड १९९०८९ १६६६२६
परभणी १३३३२० ७१६६२
हिंगोली १५७५२८ १३२०६८
बीड ८६०२२ ६७७७८
जालना ७११६७ ४००१६
औरंगाबाद १०७२३ ८११२
कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा प्रस्तावित क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
औरंगाबाद ३८७३५४ १८४६०२
जालना २९७९९२ ८१२३६
बीड ३२९३२१ १३४०६५
परभणी २५७११९ ६९६४०
नांदेड ३२३७५४ २०२६५२
हिंगोली ९२६१३ ३११७१
उस्मानाबाद २४६३२ ३७८०
लातूर ४५८६ २८४४

 

इतर अॅग्रो विशेष
वासंतीकरणाच्या प्रक्रियेतील तापमानाचे...वसंताच्या आगमनामुळे प्रत्येक वनस्पती किंवा...
मराठवाड्यात ‘रेशीम’ला रिक्त पदांचे...औरंगाबाद ः राज्याला रेशीम उद्योगात उदयोन्मुख...
खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने...जळगाव : खानदेशात आगाप पपई लागवडीला सुरवात झाली...
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा...नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे...
वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखापुणे ः अकोला जिल्ह्यातील देवरी (ता. अकोट),...
लाल वादळ मुंबईकडे झेपावलेनाशिक : गेल्या वर्षभरापासून आश्‍वासन देऊनही...
शेतकरी प्रतिनिधींची ऊस दर नियंत्रण मंडळ...पुणे: ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत शेतकरी...
जलसंधारण विभागाच्या आकृतिबंधास मान्यतामुंबई: नागपूर व पुणे येथे अपर आयुक्त तथा मुख्य...
नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द करणारः...मुंबई: नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी...
सुपीक जमीन, नियोजनातून वाढविली...हणमंतवडिये (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील राहुल...
शेडनेट, रेशीमशेती, भाजीपाला लागवडीतून...विडूळ (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील सदानंद...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...