agriculture news in marathi, seed companies in confusion regarding new regulations | Agrowon

बियाणे कंपन्यांत पाकिटावरील माहितीप्रकरणी संभ्रमावस्था
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

नागपूर : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी कमी कालावधीचे कापूस वाणाला प्रोत्साहन देण्यासोबतच पाकिटावर काही सूचना बियाणे कंपन्यांना लिहिण्याचे सक्‍तीचे केल्या जाणार, अशी माहिती अवर मुख्य सचिव (कृषी) विजय कुमार यांनी ॲग्रोवनला दिली होती. परंतु येत्या हंगामातील बियाणे कंपन्यांचे नियोजन तोंडावर असताना त्या संदर्भातील आदेश अद्याप निघाले नसल्याने कंपन्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. 

नागपूर : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी कमी कालावधीचे कापूस वाणाला प्रोत्साहन देण्यासोबतच पाकिटावर काही सूचना बियाणे कंपन्यांना लिहिण्याचे सक्‍तीचे केल्या जाणार, अशी माहिती अवर मुख्य सचिव (कृषी) विजय कुमार यांनी ॲग्रोवनला दिली होती. परंतु येत्या हंगामातील बियाणे कंपन्यांचे नियोजन तोंडावर असताना त्या संदर्भातील आदेश अद्याप निघाले नसल्याने कंपन्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. 

बोंड अळीचा प्रादुर्भाव येत्या हंगामात होऊ नये, याकरिता १८० दिवसांच्या कापूस वाणांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, पाकिटावर कोरडवाहू किंवा बागायती क्षेत्रासाठी उल्लेख असणे, त्यासोबतच गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक वाण नाही, असे नमूद असणे सक्‍तीचे केले जाणार आहे. अवर मुख्य सचिव (कृषी) विजयकुमार यांनी ही माहिती दिली होती. परंतु त्या संदर्भातील लेखी आदेश केंद्र किंवा राज्य सरकार स्तरावर निघाले नाही. परिणामी हंगाम तोंडावर असताना कंपन्यांमध्ये मात्र बियाणे पाकिटांचे प्रिटिंग करण्यासंबंधी संभ्रमावस्था आहे.

मार्च महिन्यात बियाणे पाकिटांचे प्रिटिंग पूर्ण होऊन बाजारात बियाणे पुरवठा होतो. या प्रक्रियेला काही दिवसच शिल्लक असल्याची माहिती कंपनी सूत्रांनी दिली. सरकारने पाकिटावर काय नमूद असावे, यासंबंधी लेखी आदेश काढावेत, त्यामुळे पाकिटाच्या प्रिटिंगचा निर्णय कंपन्यांना लवकर घेता येणार आहे. एेनवेळी अशाप्रकारचा निर्णय झाल्यास पाकिटे पुन्हा प्रिटिंग करणे शक्‍य होणार नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

इतर बातम्या
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...