agriculture news in marathi, seedling rates declared by agriculture department | Agrowon

फळे, मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे दर जाहीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 मे 2018

पुणे : शेतकऱ्यांना वाजवी किमतीत चांगल्या दर्जाचे कलमे, रोपे मिळावी या उद्देशाने राज्यातील फळे व मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे विक्रीदर निश्चित करण्यात आले आहेत. विक्री दरामध्ये पाच ते वीस या दरम्यान वाढ करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठे व खासगी रोपवाटिकांना विक्रीदर हे लागू राहणार आहे. 

पुणे : शेतकऱ्यांना वाजवी किमतीत चांगल्या दर्जाचे कलमे, रोपे मिळावी या उद्देशाने राज्यातील फळे व मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे विक्रीदर निश्चित करण्यात आले आहेत. विक्री दरामध्ये पाच ते वीस या दरम्यान वाढ करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठे व खासगी रोपवाटिकांना विक्रीदर हे लागू राहणार आहे. 

याशिवाय निश्चित केलेले दर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम, तसेच विविध शासकीय योजनेअंतर्गत व किरकोळ विक्रीकरिता लागू असतील. यामध्ये कलमामधील (पिशवीतील) सुमारे २४ कलमाचा समावेश आहे. यात करवंद कलमाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. पिशवीविरहित रोपामधील बारा रोपांचा समावेश आहे. तर पिशवीतील पाच रोपांचा, तर दोन कलम कांड्याचा समावेश आहे. 

राज्यात शासकीय १३६, कृषी विद्यापीठाच्या ४२ आणि खासगी ११९५ रोपवाटिका आहे. या रोपवाटिकामध्ये दरवर्षी एक कोटीहून अधिक रोपे तयार केली जातात. त्याच्या विक्रीतून जवळपास वीस ते पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, खासगी रोपवाटिकाधारक रोपांची विक्री ठरविलेल्या दरापेक्षाही अधिक रक्कम घेऊन विक्री करतात. त्यावर बंधन असण्यासाठी आणि शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेऊ नये यासाठी हे दर निश्चित केले जातात. राज्यातील कोणत्याही रोपवाटिकाधारकांनी ठरविलेल्या किमतीपेक्षा अधिक रक्कम घेऊ नये, तसे आढळल्यास किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल केल्यास संबंधित रोपवाटिका धारकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.  

फळे, मसाला पिकांच्या कलमे, रोपांचे जाहीर केलेले दर (प्रतिरोप, कलम/रुपये)

  •  पिशवीतील कलमे ः आंबा कलमे ६०, काजू ५०, चिकू  ७०, पेरू ५०, डाळिंब ३५, संत्रा, मोसंबी ३०-४०, कागदी लिंबू ३०-३५, सिडलेस लिंबू ३०, आवळा ४०, चिंच (विकसित जात) ६०, कोकम ३०, फणस ३०, लिची २५, सीताफळ ४०, अंजीर ३५, जांभूळ (स्थानिक) ३०, जांभूळ कलमे (बहाडोली) ६०, जायफळ कलमे ६०, दालचिनी ३५, करवंद ३५,  
  •  पिशवी विरहित रोपे : जंबेरी रोपे २०, खिरणी रोपे २५, मिरी रोपे १५, तेलताड ४०, नारळ - बाणावली व इतर ७०, नारळ- टी डी १००, लवंग ३०, आवळा २०, कागदी लिंबू रोपे २५, जायफळ २५, जोजोबा २०, इतर रोपे २५. 
  •  पिशवीतील रोपे ः सुपारी रोपे ३०, डॉगरीज २५, जेट्रोफा १५, इतर २५, तेलताड ४० 
  •  कलम काड्या ः आंबा, काजू, संत्रा, मोसंबी, आवळा, चिंच, बोर, चिक्कू ८, पानपिंपरी कलमकांड्या २ 

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...