शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे
शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे

धुळे : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत वनशेती उपअभियान योजनेत स्थानिक कृषी हवामान परिस्थितीनुकूल रोपांच्या प्रजाती लावण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील तीनही शासकीय रोपवाटिकांवर विविध प्रजातीची एक लाख रोपे तयार आहेत. ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

कृषी विभागात २०१७-१८ पासून राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत नव्याने वनशेती उपअभियान योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत विविध रोपांची शेतीच्या बांधावर, तसेच कमी घनतेची अथवा जास्त घनतेची लागवड करता येते. यासाठी जिल्ह्यातील तिन्ही शासकीय रोपवाटिकांवर रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रोपे लागवडीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवानापत्रानुसार रोपे उपलब्ध होऊन लाभार्थ्यांना अनुदानही मिळणार आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, जास्ती जास्त रोपांची लागवड करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी केले आहे.

रोपवाटिका स्थळे- रोपे- संख्या रोपवाटिका पिंप्री : करंज-८०००, कांचन-२०७०, सीताफळ- १२०००, रामफळ- ५०००, गुलमोहर- १५००, प्लॅटोफार्म- १३५०, अमलतास- ८००, चिंच- ५०००, फणस- १५००, बोर- ६०००, बेल- ८००, अंजण- ५०० रोपवाटिका शिरपूर : करंज-१९०,कांचन- ४०५, सीताफळ- ६८९७, रामफळ- १७५, बांबू- ३२००, गुलमोहर- २१२, प्लॅटोफार्म- ४१०, अमलतास- ३७९, चिंच- १८००, शेवगा- ४४५, फणस- २००, बोर- २७६५, बेल- २४८, अंजन- १७४, लिंबू- ७५००. रोपवाटिका साक्री : करंज- १५००, कांचन- १५००, सीताफळ- ३०००, रामफळ- १२००, कडुनिंब- २५००, गुलमोहर- १०००, प्लॅटोफार्म- ५००, अमलतास- १०००, चिंच- १८००, बांबू- २०००, फणस- १५००, बोर- ५०००, बेल- ९००, अंजण- ६००, बदाम- १०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com