agriculture news in marathi, seeds demand for rabbi season, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्याला गरज ७३ हजार क्विंटल बियाण्याची
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

अकोला   ः लवकरच सुरू होत असलेल्या रब्बी हंगामासाठी ७३ हजार क्विंटल बियाणे लागणार असून यात सर्वाधिक ४२ हजार क्विंटल बियाणे हे हरभऱ्याचे अाहे.

अकोला जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र सुमारे एक लाख १५ हजार ३०० हेक्टर अाहे. यावर्षी चांगल्या पावसामुळे व खरिपातील पेरणी न झालेले क्षेत्र पाहता एक लाख ३६ हजार ८३० हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात अाले अाहे. यात सर्वाधिक एक लाख २ हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र अाहे.

अकोला   ः लवकरच सुरू होत असलेल्या रब्बी हंगामासाठी ७३ हजार क्विंटल बियाणे लागणार असून यात सर्वाधिक ४२ हजार क्विंटल बियाणे हे हरभऱ्याचे अाहे.

अकोला जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र सुमारे एक लाख १५ हजार ३०० हेक्टर अाहे. यावर्षी चांगल्या पावसामुळे व खरिपातील पेरणी न झालेले क्षेत्र पाहता एक लाख ३६ हजार ८३० हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात अाले अाहे. यात सर्वाधिक एक लाख २ हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र अाहे.

जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ७० हजार हेक्टर असून या वेळी त्यात सुमारे ३१ हजार हेक्टरने वाढ गृहीत धरण्यात अाली अाहे. जिल्ह्यात हरभरा वगळता इतर कुठल्याही पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही. गव्हाचे सरासरी ३८ हजार ३०० क्षेत्र असताना यंदा  ३१ हजार ३०० हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकते.

मूग, उडदाची काढणी झालेल्या शेतांमध्ये हरभरा पेरणीच्यादृष्टीने शेतकरी मशागतीच्या कामांना लागले अाहेत. काहींनी पेरणीही धरली अाहे. सध्या जमिनीत अोल असून याचा फायदा शेतकरी घेत अाहेत. परतीचा पाऊस झाला तर अाणखी पिकांसाठी फायदेशीर होणार अाहे.  

हंगामात सर्वाधिक क्षेत्र राहणाऱ्या हरभऱ्याचा बियाणे बदल हा ५५ टक्के अाहे. तरी १ लाख २ हजार हेक्टरसाठी सुमारे ४२ हजार क्विटंल हरभरा बियाणे लागणार अाहे. यासाठी महाबीजकडील ३१ हजार ५०० व खासगी कंपन्यांचे ८५७५ क्विंटल बियाणे राहील. गव्हाचे ३१ हजार ३०० क्विंटल बियाणे लागणार असून महाबीज १५ हजार क्विंटलचा पुरवठा करीत अाहे. ७३ हजार ७८६ क्विटंल बियाण्यापैकी महाबीज ४६ हजार ७४० क्विंटल बियाणे पुरविणार अाहे.     
 

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...