agriculture news in marathi, seeds demand for rabbi season, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात रब्बीसाठी ७७ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

नगर   ः जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, त्यांनी रब्बीच्या पेरण्यांसाठी जमिनीची मशागत करून ठेवली आहे. या पेरण्यांसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले असून, ७६ हजार ९५१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

नगर   ः जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, त्यांनी रब्बीच्या पेरण्यांसाठी जमिनीची मशागत करून ठेवली आहे. या पेरण्यांसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले असून, ७६ हजार ९५१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पाऊस वेळेवर न झाल्याने रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी रब्बीचे सरासरी क्षेत्र सहा लाख ६५ हजार ८४९ हेक्‍टर गृहीत धरून बियाण्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात चार लाख ६३ हजार ५७१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जिल्ह्यात गोकुळाष्टमीपासून अनेक ठिकाणी रब्बीची पेरणी सुरू होते; परंतु या वर्षी अद्याप पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सहा लाख ५० हजार ६०० हेक्‍टर क्षेत्र गृहीत धरून बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ७६ हजार ९५१ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्यापैकी ५७ हजार ८५ क्विंटल बियाणे महाबीजमार्फत मागविण्यात आले आहे.

ज्वारीचे ४४००, गव्हाचे ५४ हजार, हरभऱ्याचे १७,५००, सूर्यफुलाचे नऊ, करडईचे ४२ व मक्‍याचे एक हजार क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ३६ हजार ८९४ क्‍विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक म्हणजे ३९ हजार ५२१ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. त्यामध्ये ज्वारीचे २१९८, गव्हाचे २२, ६७०, हरभऱ्याचे १२, ३९१, सूर्यफूलाचे पाच, करडईचे ४३ व मकाचे दोन हजार १३ क्विंटल बियाणे विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...