agriculture news in marathi, seeds planning for kharip, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात साडेसहा लाख क्विंटल बियाण्यांची गरज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018
औरंगाबाद : येत्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पेरणी क्षेत्रासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून ६ लाख ४७ हजार क्‍विंटल विविध पिकांच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. याची पूर्तता खासगी कंपन्यांकडील ४ लाख ७८ हजार तर महाबीजकडील १ लाख ६९ हजार क्‍विंटलच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
औरंगाबाद : येत्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पेरणी क्षेत्रासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून ६ लाख ४७ हजार क्‍विंटल विविध पिकांच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. याची पूर्तता खासगी कंपन्यांकडील ४ लाख ७८ हजार तर महाबीजकडील १ लाख ६९ हजार क्‍विंटलच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
मराठवाड्यात येत्या खरिपात ५१ लाख २१ हजार हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ७ लाख २० हजार, जालना जिल्ह्यातील ६ लाख ०९ हजार, बीड जिल्ह्यातील ७ लाख ५५ हजार, लातूर जिल्ह्यातील ६ लाख २६ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ लाख ६८ हजार, नांदेड जिल्ह्यातील ९ लाख १ हजार, परभणी जिल्ह्यातील ६ लाख १२ हजार तर हिंगोली जिल्ह्यातील ४ लाख ३० हजार हेक्‍टरचा समावेश आहे.
 
प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रानुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत प्रत्येकी ४९ हजार, बीड जिल्ह्यात ६० हजार, लातूर जिल्ह्यात १ लाख ११ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यात ६५ हजार, नांदेड जिल्ह्यात १ लाख ५ हजार, परभणी जिल्ह्यात ९८ हजार तर हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकारच्या १ लाख १० हजार क्‍विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. 
 
महाबीज व खासगी कंपन्यांकडील आवंटनातून बियाण्यांच्या मागणीची पूर्तता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात महाबीजचे ५ हजार क्‍विंटल व खासगीतील ४४ हजार क्‍विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात महाबीजचे १३ हजार तर खासगीतील ३६ हजार क्‍विंटल, बीडमध्ये महाबीजचे २८ हजार तर खासगीतील ३२ हजार क्‍विंटल, लातूरमध्ये महाबीजचे ४९ हजार तर खासगीतील ६२ हजार क्‍विंटल, उस्मानाबादमध्ये महाबीजचे २७ हजार तर खासगीतील ३८ हजार क्‍विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले.
 
नांदेडमध्ये महाबीजकडील २८ हजार तर खासगीतील ७७ हजार क्‍विंटल, परभणीत महाबीजकडील १३ हजार तर खासगीतील ८५ हजार क्‍विंटल तर हिंगोली जिल्ह्यात महाबीजकडील ६ हजार क्‍विंटल तर खासगीतील १ लाख ४ हजार क्‍विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आल्याचे नुकत्याच पार पडलेल्या खरिपाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...