सीताफळ लागवडीला सहा जिल्ह्यांत पसंती
सीताफळ लागवडीला सहा जिल्ह्यांत पसंती

सीताफळ लागवडीला सहा जिल्ह्यांत पसंती

अंबाजोगाई, जि. बीड : मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, लातूरसह विदर्भातील बुलडाणा अकोला व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून सीताफळाच्या रोपांची मागणी वाढली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत सीताफळ संशोधन केंद्रातून तेरा हजार रोपे नेऊन त्यांची लागवड केल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. गोविंद मुंढे यांनी दिली.

पावसाची अनियमितता व हवामानातील बदलाने विविध फळपिकं संकटांना बळी पडताहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही शाश्वत उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या सीताफळाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्राने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलमीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामध्ये यंदा सीताफळाच्या विविध जातीच्या ५० हजार रोपांची निर्मिती केली.

यामध्ये प्रामुख्याने धारूर-६, बालानगर, टी.पी.-७, लाल सीताफळ, हनुमान फळ, ऍनोना-२, रामफळ आदींच्या जवळपास ५० हजार रोपांची निर्मिती केली. निर्माण केलेल्या रोपांची नागपूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांनी जवळपास १३ हजार रोपे खरेदी करून नेत त्यांची लागवड केली. शासनाने सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसाहाय्य देऊ केल्याने तरुण उद्योजक यामध्ये पैसा गुंतविण्यास तयार आहेत.

सीताफळाच्या गरापासून सीताफळ रबडी, मिल्क शेक, कस्टर्ड पावडर, कस्टर्ड क्‍यूब, आइस्क्रीम बनविण्याच्या कामी सीताफळाचा गर येत आहे. नित्रूड येथे महेश मुंडे या युवकाने सीताफळातील गर गाेठवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. अशा प्रकल्पांमुळे तरुणांना रोजगार देण्याच्या कामासह विविध कंपन्यांना कच्चा माल पुरविण्याचे कामही होत असल्याचे डॉ. मुंढे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com