agriculture news in Marathi, sell increased, market stacked, Maharashtra | Agrowon

वरच्या पातळीवर वाढली विक्री, पुन्हा अडखळला बाजार
दिपक चव्हाण
सोमवार, 9 एप्रिल 2018

दरवर्षी उन्हाळ्याचा कालावधी अन्य हंगामांच्या तुलनेत चांगला राहत आहे. मात्र, या वर्षी तसे घडले नाही, तर संपूर्ण ब्रॉयलर पोल्ट्री उद्योग अडचणीत येऊ शकतो.
- डॉ. अनिल फडके, नाशिक.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उंचावलेला बाजार पुन्हा खाली आला आहे. मार्च महिन्यातील शिल्लक मालाचा दबाव, वरच्या पातळीवर वाढती विक्री आदी कारणांमुळे बाजारभावात नरमाई दिसली. 

नाशिक विभागात शनिवारी (ता.७) रोजी ५७ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात ६५ रु. पर्यंत बाजारभाव वधारला होता. मात्र, या पातळीवर विक्रीचा दबाव वाढल्यामुळे बाजारभाव टिकू शकले नाहीत. ब्रॉयलरच्या बाजारभावाच्या दृष्टीने मार्च महिना अत्यंत खराब गेला. महिन्याचा सरासरी विक्री दर ५५ रु. च्या आसपास निघेल.

मार्चमध्ये बाजाराने ४४ रु. प्रतिकिलोपर्यंतची नीचांकी पातळी गाठली होती. महिन्यातून एखादी बॅच काढणाऱ्या ओपन फार्मर्सच्या दृष्टीने मार्च महिना सर्वाधिक तोट्याचा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर, एप्रिल महिना किफायचा जाईल, असे उद्योगाला अपेक्षित आहे. तथापि, पहिल्याच आठवड्यात वरच्या पातळीवरून बाजार जवळपास दहा टक्क्यांनी खाली आला आहे. आठवड्याच्या सुरवातीला बाजार ६० वरून ६५ रुपयांपर्यंत पोचला खरा, पण त्या पातळीवर संस्थात्मक क्षेत्राकडील (कार्पोरेट) विक्री वाढल्यामुळे बाजार पुन्हा ६० रुपयांच्या खाली आला आहे.

नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की मार्च महिन्यात बाजार ४५ रुपयांपर्यंत खालावला होता. परिणामी, या मंदीमुळे ''होल्ड'' झालेल्या मालाचा दबाव बाजारात दिसला आहे. यात मोठ्या वजनाचा मालदेखील लक्षणीय प्रमाणात आहे. दुसरा मुद्दा, उन्हाळ्यात पक्ष्यांच्या वाढीत येणाऱ्या समस्यांमुळेही संस्थात्मक क्षेत्राकडून विक्री वाढली आहे. तथापि, ही तात्पुरती समस्या आहे. येत्या दोन आठवड्यांत बाजार पुन्हा सुधारेल. दर वर्षी उन्हाळ्याचा कालावधी अन्य हंगामाच्या तुलनेत चांगला राहत आहे. मात्र, या वर्षी तसे घडले नाही, तर संपूर्ण ब्रॉयलर पोल्ट्री उद्योग अडचणीत येऊ शकतो.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजाराने गती पकडली होती; मात्र ती टिकू शकली नाही. हैदराबाद, बंगळुरू येथील बाजार ६८ ते ७० रु. प्रतिकिलोदरम्यान आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्र दहा रु. ने कमी राहण्याची शक्यता आहे. १५ एप्रिलनंतर बाजारात सुधारणा अपेक्षित आहे. तथापि, एकूण माहोल फारसा आशादायक नाही. बाजारात मागणीच्या तुलनेत १० ते १५ टक्के माल अतिरिक्त असणे, हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

सलग तीन वर्षांपासून एप्रिल ते जुलै हा कालावधी बाजारभावाच्या दृष्टीने चांगला जात असला, तरी यंदा त्याची पुनरावृत्ती होईलच, असा आत्मविश्वास बाजारात दिसत नाही. २०१७ मधील मोठ्या तेजीमुळे संस्थात्मक क्षेत्राची वाढलेली आर्थिक ताकद, कच्च्या मालाचा, खासकरून स्वस्त मक्याची उपलब्धता आदी कारणांमुळे उत्पादनवाढीचा वेग मागणीच्या तुलनेत अधिक राहू शकतो. दुसरा मुद्दा, द रवर्षी तापमानवाढीमुळे होणारे नुकसान टाळण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे.

बाजारात टिकून राहण्यासाठी ओपन फार्मर्स व नॉन ब्रीडर इंटिग्रेटर्सनाही उत्पादनात सातत्य ठेवणे क्रमप्राप्त ठरत आहे. एकूणच, पुढील चार महिन्यांत मागणीच्या प्रमाणात पुरवठा संतुलित ठेवण्याचे आव्हान पोल्ट्री उद्योगापुढे आहे. राज्यपातळीवर सर्व लहान-मोठे इंटिग्रेटर्स व ओपन फार्मर्सच्या नियमित संवादातूनच संतुलित पुरवठ्याचे उ.िद्दष्ट गाठता येईल, असे दिसते.
 

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ५७     प्रतिकिलो     नाशिक
चिक्स     ३४     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३०     प्रतिनग     मुंबई
अंडी     २८७     प्रतिशेकडा     पुणे

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...